Personal Loan | घरबसल्या काही तासातच मिळेल वैयक्तिक कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Personal Loan | दिवाळी हा आपल्या भारतातील एक सगळ्यात मोठा सण आहे. दिवाळीला सुरुवात झालेली आहे. या दिवाळीनिमित्त अनेक लोक नवीन वस्तूंची खरेदी करत असतात. काही लोक घरात नवीन फ्रीज, गाडी तसेच नवीन घर घेत असतात. कारण दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी अनेक लोक नवीन वस्तूंची खरेदी करत असतात. अनेक वेळा आपण नवीन गोष्ट ही घ्यायची असेल , तर त्यासाठी वैयक्तिक कर्ज घेत असतो. वैयक्तिक कर्ज हा कर्जाचा खूप चांगला प्रकार आहे. यामध्ये तुम्हाला काही मिनिटातच पैसे मिळतात. तुम्ही अर्ज केल्यानंतर काही तासातच पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात. आता हे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा? तसेच याबद्दल पात्रता काय लागते? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

झटपट वैयक्तिक कर्ज कसे असते? | Personal Loan

वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही बँकेला भेट न देता ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. या झटपट वैयक्तिक कर्जामध्ये हे पैसे पटकन तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात. अगदी काही तासातच तुमची कर्जाची सगळी प्रक्रिया पूर्ण होते. जर तुम्हाला अगदी इमर्जन्सी पैसे लागत असतील, तर हा पर्याय तुमच्यासाठी अत्यंत योग्य पर्याय आहे.

पर्सनल लोनसाठी अर्ज कसा करायचा ?

  • तुम्हाला जर वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्डशी लिंक असलेला नंबर रजिस्टर करावा लागेल.
  • तुमची सगळी माहिती दिल्यानंतर बँक तुमची सगळी वैयक्तिक माहिती व्हेरिफाय करेल आणि तुम्ही कर्जासाठी पात्र आहात की नाही या गोष्टीचे मूल्यांकन करतील.
  • जर बँकेच्या सगळ्या पात्रतेमध्ये तुम्ही अगदी फिट होत असाल, तर तुमच्या गरजेनुसार तुम्हाला कर्जाची रक्कम दिली जाईल आणि परतफेडीचा कालावधी किती ठेवायचा आहे? हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार मिळू शकतात.
  • तुमची ही अर्जाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली, तर अगदी काही तासातच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल. कधीकधी हा निधी जमा होण्यासाठी 24 तासापेक्षाही जास्त कालावधी लागतो.

पर्सनल लोन घेण्यासाठी पात्रता | Personal Loan

  • वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.काही बँकांमध्ये अर्जदाराची वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणे गरजेचे आहे. बहुतेक बँका या 700 पेक्षा जास्त असलेल्या क्रेडिट स्कोर चांगला मानतात. जर तुमचा क्रेडिट स्कोर 700 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लगेच कर्ज मिळेल.
  • कर्ज घेताना तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या सध्याच्या मालकाकडे तुम्ही किमान एक वर्ष तरी काम केले असले पाहिजे. तसेच व्यवसाय असला, तर उत्पन्नाचा स्त्रोत दाखवणे देखील गरजेचे आहे.