जिल्ह्याबाहेर जाण्याऱ्या व्यक्तीस आरोग्य तपासणी बंधनकारक; परभणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुुंबरे

देशभर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे विविध जिल्ह्यातील कामगार, पर्यटक,भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्ती इतर शहरांप्रमाणे परभणी जिल्ह्यातही अडकले आहेत. आता त्यांना परभणी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आरोग्य तपासणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. ही आरोग्य तपासणी जिल्ह्यातील निश्चित केलेल्या ठिकाणी जावून करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिलेल्या संकेतस्थळावर सध्या नागरीक पासची मागणी करत आहेत. परंतु आरोग्य तपासणी केल्या शिवाय व या प्रमाणपत्रा शिवाय जिल्ह्याबाहेर जाता येणार नाही असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. जिल्ह्यातील सर्व खाजगी नोंदणीकृत डॉक्टर्स, दवाखाने यांचे प्रमाणपत्र ई- पास प्रक्रियेसाठी वैध असेल असेही यावेळी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

त्यामुळे आरोग्य तपासणीची सुविधा परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील साकला प्लॉट, इनायत नगर , खंडोबा बाजार , सय्यद तुराबुल हक़ दरगाह येथील नागरी प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्रात व परभणी शहर महानगरपालिका रुग्णालयात तसेच तालुकास्तरावर, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील संबंधित उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात तर ग्रामस्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment