टीम, HELLO महाराष्ट्र। देशद्रोहाच्या आरोपासह इतरही गंभीर आरोप असलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्थानच्या विशेषकोर्टातील न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय खंडपीठाने मुशर्रफ यांना ही शिक्षा सुनावली आहे.
मुशर्रफ यांनी २००७ साली देशात आणीबाणी लागू केली होती. त्यानंतर या आणिबाणीवरून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. एखाद्या सेवेतील अथवा निवृत्त लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची ही पहिलीच वेळ आहे. परवेझ मुशर्रफ 1999 ते 2008 या काळात सत्तेत होते.
A special court hands death penalty to former Pakistani military dictator Pervez Musharraf in high treason case: Pakistan Media (file pic) pic.twitter.com/8V3j7uAyZI
— ANI (@ANI) December 17, 2019
परवेझ मुशर्रफ यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येसह देशात आणीबाणी लादणे, सत्ता उलथविणे, संविधान नष्ट करणे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना अटक करणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. परवेझ मुशर्रफ यांनी 2007 ला शंभरहून अधिक न्यायाधीशांना पदावरून हटवले होते. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद येथील त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाकडे मुशर्रफ यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.