तान्हाजी चित्रपटा विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । अजय देवगण आणि काजोल या स्टार जोडीचा तान्हाजी हा चित्रपट येत्या जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तान्हाजी मालुसरे यांनी इतिहासात गाजवलेल्या शौर्याचं चित्रण या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या दृष्टिने महत्वाची बाब म्हणजे याचित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत हा मराठी माणूस आहे. ओम राऊत याने याआधी मराठीत लोकमान्यसारखा दर्जेदार चित्रपट बनविला होता. या कामिगिरीनंतर आता हिंदी चित्रपट विश्वात तान्हाजीच्या माध्यमातून ओम राऊत पदार्पण करत आहे. मात्र, आता याचित्रपटाच्या प्रदर्शनावर चिंतेचं सावट आलं आहे.

अखिल भारतीय क्षत्रिय कोळी राजपूत संघ दिल्लीच्या वतीने या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तान्हाजी मालुसरे यांची खरी वंशावळ लपविली असल्याचा आरोप केला गेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबतची याचिका स्वीकार केली असून येत्या १९ डिसेंबरला यायाचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळं दिग्दर्शक ओम राऊत यांची चिंता वाढली असून चित्रपट प्रसिद्धी आणि प्रदर्शनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

Leave a Comment