हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ- मोठे निर्णय घेतले आहे. तसेच आता चर्चेत असलेले टेरिफ निर्णयामुळे अनेक बदल झाले आहेत. यांनी देशांसाठी आयातशुल्क लागू केले आहेत, जे देश त्यांच्याकडून वस्तू आयात करत आहेत , त्यांच्याकडून 20-25% आयात शुल्क आकारले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अमेरिकेतील व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 70 डॉलरच्या खाली आल्या आहेत, यासोबतच ब्रेंट क्रूडचे दर 2% पेक्षा जास्त घसरले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील चित्र –
कच्च्या तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात घसरल्या असल्याचे चित्र दिसत आहे. विदेशी बाजारातील मागणी कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाचा भाव 16 रुपयांनी घसरून 5,929 रुपये प्रति बॅरल झाले आहेत. तसेच न्यूयॉर्कमध्ये वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड 0.26% घसरून USD 68.08 प्रति बॅरलवर, तर ब्रेंट क्रूड 0.11% घसरून USD 71.12 प्रति बॅरलवर आले आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अजून घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दर कमी होणार? –
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या या घटीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कच्च्या तेलाच्या कमी किमतीमुळे भारतातील तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची संधी मिळू शकते. म्हणजेच कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लवकरच कमी होण्याची अपेक्षा आहे. पण, देशातील तेल कंपन्यांनी कोणते निर्णय घेतले, यावर त्याच्या दरांवर परिणाम होईल. अलीकडेच, भारत सरकारने कच्च्या तेलाच्या आयातीबाबत महत्वाची माहिती दिली होती कि, भारत 40 हून अधिक देशांमधून कच्चे तेल आयात करत आहे. त्यामुळे आगामी काळात कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता करण्याची गरज नाही, असं तेलमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.