हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Petrol Car vs Diesel Car : सध्याच्या महागाईच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती देखील वाढल्या आहेत. ज्यामुळे भारतात सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारच्या मागणीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, असे असूनही लोकांकडून अजूनही पेट्रोल किंवा डिझेल कार घेण्यास प्राधान्य दिले जाते आहे. तसेच नवीन कार घेताना अनेक लोकांच्या मनात पेट्रोल कार घ्यावी किंवा डिझेल कार घ्यावी असा प्रश्न उभा राहतो. कारण या दोन्ही इंधन पर्यायांसहीत बाजारात अनेक प्रकारची वाहने उपलब्ध आहेत. मात्र काही लोकांचे असे म्हणणे आहे की, पेट्रोल कार या जास्त चांगल्या आहेत तर काही लोकांना वाटते की, डिझेल कार जास्त पॉवरफुल आहेत.
डिझेलची वाहने घेण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचे जास्त असलेले मायलेज आणि मजबूत इंजिन. मात्र आजकाल पेट्रोल इंजिनही खूप अपडेट झाले आहेत. ते आधीपेक्षा जास्त रिफाइंड झाले आहेत. याशिवाय आता त्यांचे मायलेजही खूप वाढले आहे. तर आधी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी तफावत होती, मात्र आता यामध्ये फक्त 10 रुपयांचाच फरक उरला आहे. अशा परिस्थितीत डिझेल कार घ्यावी की पेट्रोल कार घ्यावी, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. Petrol Car vs Diesel Car
या लोकांनी घ्याव्यात डिझेलच्या गाड्या
ज्या लोकांच्या गाडीचे दररोजचे रनिंग 50 ते 60 किमी असेल म्हणजेच एका महिन्यात ते सुमारे 1500 किमी असेल तर त्यांनी पेट्रोल कार खरेदी करावी. तसेच जर आपल्या गाडीचे दररोजचे रनिंग 70 ते 100 किमी असेल म्हणजेच एका महिन्यात ते 3000 किमी असेल तर डिझेल कार खरेदी करावी, असे मत अनेक तज्ञ व्यक्त करतात. Petrol Car vs Diesel Car
फायदे आणि तोटे समजून घ्या
तज्ज्ञ पुढे सांगतात कि, पेट्रोल कारपेक्षा डिझेलच्या कारचा मेंटेनन्स जास्त असतो. तसेच पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कारचे आयुष्य देखील 5 वर्षांनी कमी असते. आजकाल पेट्रोलच्या गाड्याही डिझेलच्या बरोबरीने मायलेज देऊ लागल्या आहेत. मात्र, लिटरमागे 4 ते 5 किलोमीटरचा फरक आहे. Petrol Car vs Diesel Car
किंमतीमधील फरक पहा
हे लक्षात घ्या कि, पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेलच्या कारची किंमत खूप जास्त असते. जर आपण Hyundai Venue चे उदाहरण घेतले तर त्याच्या पेट्रोल S मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 8.90 लाख रुपये आहे. तर त्याच्या S प्लस डिझेल मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.40 लाख रुपये आहे. या कारच्या बाबतीत, ते सुमारे 1.5 लाख रुपये त आहे. इतर वाहनांमध्ये ते कमी-जास्त असू शकेल. Petrol Car vs Diesel Car
हे पण वाचा :
LIC ची जबरदस्त पॉलिसी! 4 वर्षांसाठी पैसे जमा करून मिळवा 1 कोटीचा फायदा
New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई
Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन
Earn Money : आता घरबसल्या कंपन्यांसाठी ‘हे’ काम करून दरमहा मिळवा लाखो रुपये
Small Saving Scheme : आता ‘या’ लहान बचत योजनांमध्ये पॅन-आधार शिवाय करता येणार नाही गुंतवणूक