New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : जर आपल्याला नोकरीसोबतच अतिरिक्त कमाईसाठी एखादा साईड बिझनेस करायचा असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरू शकेल. कारण आज आपण एका अशा बिझनेस आयडियाबाबत जाणून घेणार आहोत. जी अगदी घरबसल्या सहजपणे करता येऊ शकेल. तसेच यासाठी खर्चही कमी आणि कमाईही चांगली होईल. तर आज आपण गिफ्ट बास्केट बनवण्याच्या व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. आजकाल लग्न किंवा इतर कोणत्याही समारंभामध्ये गिफ्ट बास्केट देण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे. म्हणूनच पैसे कमवण्याचा हा एक उत्तम मार्ग होऊ शकेल.

How to Start a Gift Basket Business – Gift Basket Business

या व्यवसायातील एक चांगली बाब अशी कि, यामध्ये पैशांच्या बाबतीत लोकं फारशी घासाघीस करत नाहीत. जर आपण वाजवी किंमतींत त्याची विक्री करत असाल तर आपल्याला चांगली किंमत मिळेल. हे लक्षात घ्या कि, शहरी भागामध्ये हा व्यवसाय जास्त वाढू शकतो. कारण इथे नेहमीच काही ना काही कार्यक्रमांचे आयोजन होतच असते. New Business Idea

Raksha Bandhan Special: Gift hampers by Guwahati-based small business owners

अशा प्रकारे सुरू करता येईल व्यवसाय

या व्यवसायासाठी आपल्याला बॉक्स रिबन, बास्केट गुंडाळण्यासाठी कागद, काही आर्ट अँड क्राफ्टचे सामान आणि विविध सजावटीच्या वस्तूंची आवश्यकता असेल. याशिवाय कात्री, टेप, स्टेपलर आणि खळ यांसारख्या काही स्टेशनरी देखील घ्यावे लागतील. तसेच काही बास्केट खरेदी कराव्या लागतील. New Business Idea

Starting a Gift Basket Side Business | SideHustle HQ

गिफ्ट बास्केट म्हणजे काय?

विविध प्रकारचे गिफ्ट चांगली सजावट करून एका बास्केटमध्ये पॅक केले जातात. याला गिफ्ट बास्केट असे म्हणतात. यामध्ये 2-3 किंवा जास्त गिफ्ट देखील असू शकतात. अनेकदा लोकं फक्त पॅक केलेली फळे गिफ्ट म्हणून देतात. हे लक्षात घ्या कि, या बास्केटमध्ये जितके साहित्य असेल, त्यानुसार त्याची किंमतही वाढेल. जर यासाठी 1000 रुपये गुंतवले तर ते 1300-1400 रुपयांमध्ये विकता येईल. साधारणतः एकदा व्यवसाय सेट झाल्यानंतर दरमहा 20-25 हजार रुपये कमवता येतील. New Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ