Petrol-Diesel Price : पेट्रोल- डिझेल होणार स्वस्त!! सरकार देणार आनंदाची बातमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेल (Petrol-Diesel Price) हि आजकाल जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. मात्र मार्चपासून ते आतापर्यंत कच्चा तेलाच्या किंमतीत 19 टक्क्यांची घसरण होऊनही अद्याप तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही कपात केलेली नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार कडून पेट्रोल- डिझेलच्या किमतीत घट करण्यात येऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार सणासुदीच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 2 ते 3 रुपये कपात करण्याच्या विचारात आहे. असं झाल्यास आधीच महागाईच्या खाईत लोटलेल्या सर्वसामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळेल.

येत्या महिनाभरात निर्णय – Petrol-Diesel Price

रेटिंग एजन्सी ICRA च्या अहवालानुसार, या महिन्यात भारतात आयात केलेल्या कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल $ 74 वर आली आहे. मार्चमध्ये त्यांच्या किमती $83-84 होत्या. ICRA चे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश कुमार कदम म्हणाले, ‘मार्च-सप्टेंबर दरम्यान तेल विपणन कंपन्यांच्या उत्पन्नात पेट्रोलवर प्रति लिटर 15 रुपये आणि डिझेलवर 12 रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे. अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर 2 ते 3 रुपये प्रति लिटरने कमी होऊ शकतात. मात्र हा निर्णय कधी घेण्यात येणार याविषयी माहिती समोर आली नाही. पण येत्या महिनाभरात असा निर्णय घेऊन सरकार सर्वसामान्य माणसाला खुश करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या देशात सर्वात महागडे पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price) आंध्र प्रदेशात मिळते. तिथे पेट्रोल 108.46 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96 रुपये प्रति लिटर आहे. यानंतर केरळमध्ये 107 रुपये/लिटर, मध्य प्रदेशात 106 रुपये/लिटर आणि बिहारमध्ये पेट्रोलचा दर 105 रुपये/लिटर आहे. तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलच्या वाहतुकीचा खर्च आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज ठरवतात.