Petrol Price : पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर, तुमच्या शहरात पेट्रोलचे दर काय आहेत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) सोमवारी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले. आजही दरात कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर या महिन्यातही दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 94.14 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

दिवाळीच्या एक दिवस आधी सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारच्या घोषणेपासून इंधनाचे दर जवळपास स्थिर आहेत.

पेट्रोल डिझेलची किंमत
>> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर आहे.
>> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर आहे.
>> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर आहे.
>> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लिटर आहे.

‘या’ शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल 100 रुपयांच्या खाली
>> पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 82.96रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लिटर आहे.
>> नोएडा पेट्रोल 95.91 रुपये आणि डिझेल 87.01रुपये प्रति लिटर आहे.
>> इटानगरमध्ये पेट्रोल 92.02 रुपये आणि डिझेल 79.63 रुपये प्रति लिटर आहे.
>> चंदीगड पेट्रोल 94.23 रुपये आणि डिझेल 80.9 रुपये प्रति लिटर आहे.
>> आयझॉल पेट्रोल 94.26 ​​रुपये आणि डिझेल 79.73 रुपये प्रति लिटर आहे.
>> लखनऊ पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.80 रुपये प्रति लिटर आहे.
>> शिमला पेट्रोल 95.78 रुपये आणि डिझेल 80.35 रुपये प्रति लिटर आहे.
>> पणजी 96.38 रुपये आणि डिझेल 87.27 रुपये प्रति लिटर आहे.
>> गंगटोक 97.7 रुपये आणि डिझेल 82.25 रुपये प्रति लिटर आहे.
>> रांची 98.52 आणि डिझेल 91.56 रुपये प्रति लिटर आहे.
>> शिलाँग 99.28 आणि डिझेल 88.75 रुपये प्रति लिटर आहे.
>> डेहराडून 99.41 आणि डिझेल 87.56 रुपये प्रति लिटर आहे.
>> दमण 93.02 रुपये आणि डिझेल 86.90 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

अशा प्रकारे तुम्ही आजच्या नवीन किंमती जाणून घेऊ शकता
तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP असे लिहून 9224992249 या क्रमांकावर आणि 9223112222 या क्रमांकावर RSP लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.