अत्यावश्यक सेवा वाहनासाठी पेट्रोलपंप दुपारी 2 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : संचारबंदीच्या नवीन नियमानुसार बाजारपेठा आणि पेट्रोल पंप सात ते दुपारी दोन पर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू राहणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवांसाठी दुपारी दोन ते सायंकाळी सात पर्यंत शहरातील ठराविक पंधरा पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात येणार आहेत, इतर पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे परिपत्रक मंगळवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहे.

परिपत्रकात म्हटले आहे की, 15 जून पर्यंत सकाळी सात वाजेपासून ते दुपारी दोन पर्यंत सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल भरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजल्या पासून सायंकाळी सात वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना इंधन पुरवठा करण्यासाठी महापालिका हद्दीतील पंधरा पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात येणार आहेत.

या पंपामध्ये जळगाव हर्सूल टी पॉइंट येथील एचपी पेट्रोल पंप, महावीर चौकातील बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौकातील हिंद पेट्रोलपंप, दिल्ली गेट येथील पेट्रोलपंप, टीव्ही सेंटर येथील पोलिसांचा पेट्रोलपंप, चिकलठाणा येथील पोलिसांचा पेट्रोलपंप, सेव्हन हिल येथील अंबरवडिकर पेट्रोलपंप, रेल्वे स्टेशन रोडवरील लोळगे पेट्रोलपंप, मुकुंदवाडी येथील जानकीसेवा पेट्रोलपंप, सेवन हिल येथील जागृत पेट्रोल पंप, पैठण रोडवरील मिसरवाडी हायवे पेट्रोल पंप, बीड बायपासवरील नर्मदा ऑटो पेट्रोल पंप, बीड बायपासवरील नर्मदा ऑटो पेट्रोल पंप, बीड बायपासवरील रामकृष्ण पेट्रोल पंप, आपल्या शरणापुर फाट्याजवळील एम गिरजा समर्थ पेट्रोल पंप, वाळूज बजाज नगर पंढरपूर व इतर औद्योगिक वसाहतीसाठी नगर हायवे वरील पेट्रोल पंप सुरू राहतील. पेट्रोल पंपावर येणाऱ्या सर्व वाहन चालकांनी कोरोनाचे नियम पाळत असले पाहिजेत, अशा स्पष्ट सूचना ही जिल्हाधिकाऱ्यांनी या परिपत्रकातून दिले आहेत.

Leave a Comment