Wednesday, February 1, 2023

वादळाने केवळ शेतकरीच नाही तर अनेक गरिबांचे संसार सुद्धा उघड्यावर , फडणवीसांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागात जोरदार वादळ आणि पाऊस झाल्याने राज्यातील अनेक भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच काही लोकांच्या घरांचे देखील नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्त जळगाव भागाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

- Advertisement -

या पाहणी दौऱ्याबाबत बोलताना फडणवीस यांनी म्हंटले आहे की ‘या वादळाने केवळ शेतकरीच नाही तर अनेक गरिबांचे संसार सुद्धा उघड्यावर पडले आहेत’. या व्हिडिओमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोवबत गावातील सरपंचांसह अधिकारी देखील असल्याचे दिसत आहे. या वादळात घरचे नुकसान झालेल्या कुटुंबाला फडणवीस यांनी भेट देऊन माहिती घेतल्याचे दिसत आहे. जळगाव मध्ये शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागाचा दौरा देखील फडणवीस यांनी केला. यावेळी केवळ शेतीचेच नाही तर घरांचे देखील नुकसान झाल्याचे फडणवीस यांनी म्हंटले आहे.

केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल

तौक्ते चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राबरोबर गुजरात राज्याला देखील बसला आहे. त्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथे हवाई पाहणी केली होती. मदतही जाहीर केली होती. एव्हढेच नव्हे तर ‘यास’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांची देखील मोदींनी हवी पाहणी केली. मात्र महाराष्ट्रात नुकसान झाले तरी मोदींनी राज्याकडे दुर्ल्क्ष केल्याची टीका केली जात होती. मात्र त्यानंतर केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. दरम्यान चक्रीवादळग्रस्त भागात दौरा करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून नुकसानग्रस्त भागांची करणार पाहणी रायगड पासून पाहणीची सुरुवात करण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यामध्ये मध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे. आजपासून पाहणीला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय पथक ५ जूनला रत्नागिरी आणि ६ जूनला सिंधुदुर्ग ला पथक करणार पाहणी करण्यात येणार आहे.