हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सरकाराने संपूर्ण राज्यात संचारबंदी लावली. लोकांच्या काळजीपोटी सरकारने घरात बसा असं सांगितल्यानंतरही अनेक बाहेर फिरतांना दिसत आहेत. गर्दी करताना दिसत आहेत. रस्त्यांवर वाहन घेऊन फिरताना दिसत आहेत. यावर अखेरचा उपाय म्हणून आता पुण्यात सामन्यांना पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेल विक्री बंद करण्यात आली आहे.
करोनाचा प्रादुर्भावमुळे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबत आदेश दिले आहेत. आज रात्रीपासून या आदेशाची अंलबजावणी सुरू होणार आहे. या आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत पुण्यात सामन्यांना पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेल विक्री बंद राहणार आहे. अत्यंत तातडीची गरज निर्माण झाली तर त्यासाठी सबळ कारण असल्याचं सामान्यांना इंधन देण्याचे या आदेशात म्हटलं आहे. अनेक लोक गरज नसतांना रस्त्यांवर दिसत असल्यानं प्रशासनावर सामन्यांना पेट्रोल विक्री बंद करण्याची वेळ आली आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.