PF Intrest Rate | PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ; व्याजदरात झाली 0.8 टक्के दराने वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PF Intrest Rate | खाजगी नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची EPFO खाते असते. याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना असे म्हणतात. यामध्ये कर्मचाऱ्याचा दर महिन्याच्या पगारातील काही रक्कम ही EPFO खात्यात जमा केली जाते. आता या सदस्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता केंद्रीय अर्थमंत्रालयाने PF वरील (PF Intrest Rate) ठेवींवर व्याजदरात वाढ करण्यास मंजुरी दिलेली आहे. PF वर आता 8.25 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

फेब्रुवारीमध्येच EPFO यांनी 2023- 24 या वर्षासाठी 8.25% व्याज देण्याची घोषणा केली होती. परंतु आता अर्थ मंत्रालयाने या घोषणेस मंजुरी देखील दिलेली आहे. एक्सवर EPFO कडून याबाबत माहिती देखील शेअर करण्यात आलेली आहे 2023- 24 या आर्थिक वर्षासाठी PF वरील व्याजदर 0.10% दराने वाढ करण्यात आलेली आहे.

याआधी PF (PF Intrest Rate) वरील व्याजदर हे 8.15% एवढे होते. परंतु आता त्यामध्ये वाढ करून 8.25 टक्के एवढा करण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयांकडे देखील पाठवला होता. आणि त्यालाच त्यांनी मंजुरी दिलेली आहे. त्यांना वर्षातून एकदाच व्याज दिले जाते. हे व्याज त्यांना आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मार्च रोजी दिले जाते.