PF Money Windraw | खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असले. पीएफ अकाउंटमध्ये कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम या खात्यामध्ये गुंतवली जाते. ईपीएफओद्वारे कर्मचाऱ्यांसाठी ही एक अत्यंत चांगली योजना राबवली जाते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर तुम्हाला व्याजदर देखील खूप चांगले मिळते. सेवानिवृत्ती झाल्यानंतर तुमच्या पुढील आयुष्यसाठी एक ठराविक रक्कम तुम्हाला दिली जाते. हे पैसे तुम्हाला सेवानिवृत्तीमध्ये नंतर मिळतात. परंतु जर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये आधीच हे पैसे काढायचे असेल तरी देखील तुम्ही काढू शकता.
जर तुमच्या घरात एखादी मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा कोणाचे लग्न असेल किंवा इतर कोणत्याही कारणासाठी तुम्ही हे पैसे काढू शकता. हे पैसे काढण्यासाठी तुम्हाला युएनए नंबर असतो. यासाठी तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक अकाउंट या पीएफ 9PF Money Windraw) खात्याशी लिंक असणे गरजेचे असते. तुम्ही पीएफ खात्यातून ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर तुम्ही ड्रॉप डाऊन मेनू मधील क्लेम फॉर्म करा. त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमची माहिती दिसेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या बँक अकाउंट शेवटचे चार नंबर टाका. आणि व्हेरिफाय करा. त्यानंतर तुम्ही अंडरटेकिंग सर्टिफिकेटवर साइन इन करा. आणि नंतर तुम्हाला प्रोसेस फॉर ऑनलाईन प्लेनवर क्लिक करावे लागेल. हा फंड तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी तुम्ही फॉर्म 31 वर क्लिक करा.
यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन सेक्शन ओपन होईल. तुम्हाला तिथे पर्पज फॉर व्हिच ऍडव्हान्स इस रिक्वायर्ड यावर क्लिक करावे लागेल. तुम्हाला जेवढी रक्कम काढायची आहे तेवढी रक्कम टाका. त्यानंतर सबमिट करावे लागेल आणि तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करावी लागते. तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे पाठवले जाईल. ही प्रोसेस पूर्ण व्हायला 15 ते 20 दिवस लागतात.