हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. पीएफआय ही सायलेंट किलर असून महाराष्ट्रातही पीएफआय आणि त्यासंबंधित अन्य ६ संघटनावर बंदी घालणायचे काम करण्यात येईल फडणवीस म्हणाले.
पीएफआय हा एक सायलेंट किलर होता. पीएफआयच्या माध्यमातून देशात दुष्प्रचार सुरू होता. एक मानवी चेहरा दाखवायचा आणि पाठीमागून कृत्य करायचे . यात वेगवेगळे लोक आहेत त्यांच्या सहभागानुसार कारवाई होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणालं आहे. सिमीवर बंदी घातल्यानंतर काही लोकांनी पीएफआय सारख्या संघटना काढल्या आणि अशी कृत्ये सुरु केली असेही ते म्हणाले.
LIVE | Media interaction on #PFI | Mumbai
Deferred Live https://t.co/cmPtauhlmL
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 28, 2022
पीएफआयद्वारे फंडींगचे मॉडेल्सही तयार करण्यात आले होते. खूप अकाऊंट्स ओपन करायचे, या अकाऊंटमधून थोडा-थोडा पैसा आणायचा म्हणजे कोणाच्या लक्षातही येणार नाही, या सगळ्या गोष्टीचे पुरावे उपलब्ध आहेत असं फडणवीस म्हणाले.
सर्वात आधी केरळ सरकारने पीएफआय वर बंदी घालण्याची मागणी केली, त्यानंतर वेगवेगळ्या सरकारांनी याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला, त्याबाबत पुरावेही सापडले. महाराष्ट्रातही अमरावती सारख्या शहरात मोर्चे काढण्यात आले, तोडफोड करण्यात आली. देशातील उत्तर-पूर्व भागात मशीद तोडल्याच्या खोट्या प्रचार करून हे सगळं करण्यात आलं. पीएफआयकडून अशाच प्रकारचे कृत्य केले जात होते, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.