फलटणकरांची चिंता वाढली : ओमायक्रॉन बाधिताचे आई- वडिल कोरोना पाॅझिटीव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण । फलटणला काही दिवसापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील युगांडाहून आलेले तिघेजण ओमायक्रॉन बाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. आता बाधितांच्या संपर्कातील त्याचे आई- वडिलाचा अहवाल कोरोना बाधित आल्याने फलटणकरांची चिंता वाढलेली आहे. अद्याप आई व वडिलाचा ओमायक्रॉनचा अहवाल येणे बाकी आहे.

फलटण शहरांमध्ये आफ्रिकेतील युगांडा होऊन आलेले एकाच कुटुंबातील चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील तिघांना ओमायक्रॉनची लागण झाली होती. बाधित ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते, त्यातील सर्व लोकांचे तसेच त्यांच्या आई-वडिलांची असे मिळून 36 जणांची कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 34 जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले असून दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

प्रशासनाने बाधितांच्या आई- वडीलाचे ओमायक्रॉनच्या टेस्टसाठी नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. या दोघांच्या संपर्कात लोकांचा प्रशासनान युद्धपातळीवर शोध घेत आहे. युगांडाहून चौघे ज्यावेळी फलटणला आले, त्यावेळी त्यांचे आई वडील दुसरीकडे राहायला गेले होते. चौघे बाधित येऊन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्यावर त्यांचे आई वडील पुन्हा त्याठिकाणी राहायला आले होते.