फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे
फलटण शहरातील महात्मा फुले चौकातील श्रीराम बझारचे मागील बाजूचे शटर उचकटून आत प्रवेश करून, अज्ञात चोरट्याने बझारच्या कॅश काऊंटर मधील 1 लाख 32 हजार २६६ रुपये चोरून नेले आहेत.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यामधून मिळालेल्या माहिती अशी, तक्रारदार विनायक बाबुराव शिंदे (वय 50 वर्षे, व्यवसाय मॅनेजर रा. फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. विनायक शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत दि. 17 जून रोजी दुपारी 4.30 ते 18 जून सकाळी 7.30 वा. चे दरम्यान श्रीराम बझार फलटण महात्मा फुले चौक येथील गोडाऊनचे पाठीमागील शटर उचकटले होते. या अज्ञात चोरटयाने बझारमध्ये आत प्रवेश करुन, तिजोरीमधील रोख रक्कम व चिल्लर अशी एकुण 1 लाख 32 हजार 266 रुपये अज्ञात चोरट्याने चोरलेले आहेत. तसेच चोरीस गेलेल्या रक्कमे पैकी 50 हजार रुपये घटनास्थळी मिळून आले आहेत.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी भेट देऊन सदर ठिकाणची पहाणी केली आहे.
अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.