हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Charger : आजकाल स्मार्टफोनचा वापर फारच वाढला आहे. आपल्या दररोजच्या आयुष्यातील अशी अनेक कामे आहेत ज्यासाठी स्मार्टफोन वापरला जातो. मात्र आपला फोन जितका महत्त्वाचा आहे तितकाच त्याचा चार्जर देखील महत्त्वाचा आहे. मात्र जर कधी आपला फोन चार्ज झाला नाही तर… आजच्या काळात अशी कल्पनाही करवत नाही. कारण आजकल फोन हा मनोरंजनासोबतच आपली गरजही बनला आहे. यामुळेच तो डिस्चार्ज होऊ नये यासाठी आपल्यापैकी अनेकजण आपला फोन सतत चार्जिंगला लावतात.
जर आपल्या सभोवताली पहिले तर आपल्याला असे लक्षात येईल की, अशीही काही लोकं आहेत जे आपला फोन जराही डिस्चार्ज झाला तरी तो लगेचच चार्जिंगला लावतात. मात्र असे करण्याने आपल्या फोनचे नुकसानच होते. यापासून आपल्या चार्जरची देखील सुटका झालेली नाही. Charger
आपल्यापैकी 99% लोकं फक्त Charger मधून फोन बाहेर काढतात. मात्र चार्जर आहे तसाच सॉकेटमध्ये लावून ठेवतात. याशिवाय अशी किती लोकं असतील जे आधी चार्जरमधून फोन काढतात आणि मग सॉकेटममधून चार्जर काढून ठेवतात.
तर असे करणाऱ्या लोकांची संख्या निश्चितच कमी असेल. एनर्जी सेव्हिंग ट्रस्टच्या मते, प्लग इन केलेला कोणत्याही स्विच ऑन चार्जरकडून वीज वापरली जाईल. मग भलेही आपला डिव्हाइस कनेक्ट केलेला असो की नाही. हे प्रत्यक्षात विजेचे फक्त काही युनिट्स वापरत असेल. तरीही याद्वारे हळूहळू आपल्या Charger चे आयुष्य कमी होऊ शकेल.
अशा तऱ्हेने लोकांकडून नकळतपणे आपल्या फोनच्या बॅटरीचे आयुष्य देखील कमी केले जाते. कारण आपला फोन वारंवार चार्ज केल्याने त्याच्या बॅटरी लाईफवरही परिणाम होतो. यामुळेच आपल्या फोनच्या बॅटरीसाठी 40-80 नियम फॉलो करायला हवा. ऑप्टिमाइझ केलेल्या बॅटरी लाइफसाठी आपला फोन कधीही 40 टक्क्यांपेक्षा कमी किंवा 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज नसावा. Charger
अनेकदा लोकं वेगवेगळ्या चार्जरने फोन चार्ज करतात. मात्र कोणत्याही बॅटरीसाठी हे योग्य ठरणार नाही. यामुळे नेहमीच आपल्या ओरिजनल चार्जरनेच आपला फोन चार्ज करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/mobile-accessories/mobile-chargers/pr?sid=tyy%2C4mr%2Ctp2
हे पण वाचा :
होळीला रंग खेळताना Smartphone पाण्यात पडला तर तातडीने करा ‘हे’ काम
Business Idea : ‘या’ वनस्पतीची लागवड करून मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Smartphone वापरताना कधीही करू नका ‘या’ चुका, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान
Edible Oil : होळीच्या दिवशी मागणीत वाढ होऊनही खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या
Recharge Plans : ‘या’ टेलिकॉम कंपन्या 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनअंतर्गत देत आहेत अनेक फायदे