Business Idea : ‘या’ वनस्पतीची लागवड करून मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : आजकाल शेतकरीही पारंपरिक शेती सोडून नगदी पिकांकडे वळू लागले आहेत. जर व्यवसायाच्या उद्देशाने शेती केली तर त्याद्वारे मोठी कमाई करता येऊ शकेल. आजच्या आपल्या बातमीमध्ये आपण एका अशा एका फुलाबाबतची माहिती जाणून घेणार सांगणार आहोत. ज्याची लागवड करून मोठा नफा मिळवता येऊ शकेल.

Geranium Cultivation Information Guide | Agri Farming

तर आज आपण ज्या फुलाबाबत बोलणार आहोत त्याचे नाव आहे geranium. हे एक तांबडी किंवा पांढरी फुले येणारे एक सुवासिक फुलझाड आहे. या वनस्पतीला गरिबांचा गुलाब असेही म्हंटले जाते. सध्या शेतकऱ्यांना सुगंधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी सरकारकडून इन्सेन्टिव्ह दिले जात आहे. यासाठी सरकारने अरोमा मिशन अंतर्गत काम सुरु केले आहे. Business Idea

या फुलझाडाच्या फुलांपासून तेल काढले जाते, ज्याचा वापर औषधाव्यतिरिक्त इतर अनेक कारणांसाठी देखील केला जातो. geranium च्या तेलाला गुलाबासारखा वास येतो. जे सौंदर्य उत्पादने, परफ्यूम, सुगंधित साबण आणि अरोमाथेरपीमध्ये वापरले जाते. Business Idea

Geranium farming Step Wise Guide With all important Details

जिरेनियमचे औषधी फायदे

जिरेनियमचे तेल औषध म्हणूनहीवापरले जाते. याच्या वापराने अल्झायमर, न्यूरोलॉजिकल विकार आणि विकारांची समस्या कमी होते. यासोबतच मुरुम, जळजळ आणि एक्जिमा यांसारख्या स्थितींमध्येही याचा वापर फायदेशीर असल्याचे म्हंटले जाते. तसेच याच्या वापराने वृद्धत्वाचा प्रभावही कमी होतो. याबरोबरच स्नायू आणि त्वचा, केस आणि दात गळतीमध्ये देखील याचा वापर फायदेशीर मानला जातो.

लागवड कुठे कुठे केली जाते???

जिरेनियमच्या झाडाची लागवड कुठेही करता येते. मात्र यासाठी वालुकामय चिकणमाती ही सर्वोत्कृष्ट मानली जाते. तसेच या झाडांना खूपच कमी पाणी लागत असल्याने कमी पाऊस असलेल्या ठिकाणी देखील याची लागवड करता येते. तसेच कमी आर्द्रता असलेले सौम्य हवामान त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी सर्वोत्तम मानले जाते. सेंट्रल मेडिसिनल अँड प्लांट इन्स्टिट्यूटमधून आपल्याला जिरेनियमचे झाड खरेदी करता येईल. त्याची लागवड करून शेतकऱ्यांना अगदी कमी पैशात मोठा नफा मिळवता येऊ शकेल. Business Idea

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

खर्च आणि कमाईचे गणित

जिरेनियमच्या झाडाच्या लागवडीसाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च येईल. त्याचे तेल खूप महाग विकले जाते. बाजारात त्याला सुमारे 20,000 रुपये प्रति लिटरचा भाव मिळतो. त्याच्या झाडाद्वारे 4-5 वर्षे सहजपणे उत्पादन मिळते. अशा प्रकारे याद्वारे दरवर्षी लाखो रुपये कमवता येतील. Business Idea

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://eagri.org/eagri50/HORT282/lec12.html

हे पण वाचा :
Edible Oil : होळीच्या दिवशी मागणीत वाढ होऊनही खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या
Bank Of Baroda ची जबरदस्त ऑफर! गृहकर्ज झाले स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ
Stock Market मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 7 शब्दांचा अर्थ जाणून घ्या
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!! होळीनंतर वाढणार इतका पगार
Multibagger Stock : कंप्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा