हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात कोरोनाच्या काळात माणसं माणसात राहिली नाहीत. अनेकांना आपला रोजगार सोडून आपल्या आशा आकांक्षांना मनाच्या एका कोपऱ्यात बसवून आपले शहर सोडून सुरक्षेसाठी गावाकडे पलायन केले आहे. काहींना खूप चांगली वागणूक गावाकडे मिळाली परंतु काहींना चुकीच्या पद्धतीने सामोरे जावे लागले. गजबटलेली शहरे ओस दिसू लागली आणि गाव वाड्यांचे कामकाज , व्यवहार काही दिवसात ठप्प झाला. प्रवाशांविना प्रवास हि थांबला. ते सगळं ठीक आहे वो परंतु माणसाच्या मनामनात जे अंतर पडलं जात आहे त्याच काय? सख्खे सख्याच्या मदतीला धावून येत नाही. कोणी वृध्दापकाळाने गेले असेल तरी त्याच्या मदतीला कोणी धावून येत नाही .
कोरोना सारखे असे अनेक आजार येतील आणि जातीलही पण माणसांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या दरीच काय? कोरोनाच्या काळात शारीरिक अंतर हे हे असायलाच पाहिजे पण आपल्याकडून समोरच्या वक्तीला दिलेली वागणूक हि योग्य कि अयोग्य त्याचा विचार करायला पाहिजे . अश्या वेळी त्यांच्या नजर कश्या बदलणार ?
शहरातून आलेल्या अनेक लोकांना आपल्या घरच्यांनीच घराचा कोपरा दिला नाही अनेकांना आपला संसार हा उघडयावर मांडावा लागला अनेकांनी झाडे आणि गोठ्याचा उपयोग संसार बसवण्यासाठी केला. आणि अश्या नात्यात अविश्वास आणि दुरावा निर्माण झालाच कि. माणसे अंतराने दूर गेलीच, मनानेपण दूर गेलीच , भावनेने अजून दूर गेली. माणूस संकटाच्या वेळीच एकमेकांच्या मदतीची अपेक्षा करत असतात. पण संकटातच कमी नाही आला तर मात्र त्रास होतो.
कोरोनाच्या काळात दुरी जरुरुची आहे पण आपल्या बोलण्याने किंवा वाक्याने मन दुखावली जातील ती मन जपता आली पाहिजेत. शेवटी काय तो आजार आहे तो केव्हा ना केव्हा जाणारच त्यासाठी काळजी घेण्याची गरज आहेच परंतु त्यापेक्षाही काळजी हि माणसा -माणसांत आणि रक्ताच्या नात्यात अंतर पडणार नाही याची घ्यायला हवी.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in