PIB fact Check : 500 रुपयांची ‘ही’ नोट खरी आहे की बनावट, अशा प्रकारे समजून घ्या

PIB fact Check
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB fact Check : सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये RBI गव्हर्नरच्या स्वाक्षरीऐवजी गांधीजींची हिरवी पट्टी असलेल्या 500 रुपयांच्या नोटा बनावट दावा केला जातो आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा आहे कारण RBI म्हणते की, या दोन्ही प्रकारच्या नोटा कायदेशीर आहेत. सरकारचे अधिकृत वेबसाईट असलेल्या PIB fact Check ने लोकांना सोशल मीडियावरील अशा बनावट बातम्यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

The embarrassment that is PIB Fact Check: Who fact-checks this 'fact checker '?

PIB fact Check ने एक ट्विट करत म्हटले की, RBI च्या मते, गांधीजी किंवा आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीच्या जवळ हिरव्या पट्टी असलेल्या सर्व नोटा वैध आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, महात्मा गांधींच्या नवीनसिरीज मधील 500 रुपयांच्या नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी आहे. या नोटेच्या उलट बाजूस देशाचा सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या “लाल किल्ल्याचे” छायाचित्र देखील आहे. तसेच नोटेचा मूळ रंग स्टोन ग्रे असला तरी, त्यामध्ये इतर डिझाईन्स आणि जिओमेट्रीक पॅटर्न देखील आहेत.

अशा प्रकारे ओळखा 500 रुपयांची खरी नोट (PIB fact Check)

नोटेचा आकार : खऱ्या 500 रुपयांच्या नोटेचा अधिकृत आकार 66 मिमी x 150 मिमी आहे.
तसेच या नोटेवर 500 हा अंक देवनागरीत लिहिलेला असेल.
या नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचे छायाचित्र असेल.
बारीक अक्षरात ‘भारत’ आणि ‘इंडिया’ असे लिहिलेले असतील.
तसेच नोटेच्या उजव्या बाजूला अशोक स्तंभाचे चिन्ह देखील असेल.
500 च्या नोटेच्या डाव्या बाजूला नोट छापण्याचे वर्ष आहे.
तसेच या नोटेवर स्वच्छ भारत लोगो हे स्लोगन लिहिलेले असेल.
‘भारत’ आणि ‘आरबीआय’ या शिलालेखांसह कलर शिफ्ट विंडोवाली सिक्योरिटी थ्रेट.
500 ची नोट झुकल्यावर धाग्याचा रंग हिरव्या ते निळ्यामध्ये बदलतो.
तसेच यामध्ये गॅरेंटी क्लॉज, गव्हर्नरच्या स्वाक्षरीसहीत प्रॉमिस क्लॉज आणि महात्मा गांधींच्या पोर्ट्रेटच्या उजवीकडे RBI चिन्ह असेल.
या नोटेवर महात्मा गांधींचे पोर्ट्रेट आणि इलेक्ट्रोटाइप (500) वॉटरमार्क असेल.
या नोटमध्ये वरच्या डाव्या आणि खालच्या उजव्या बाजूला चढत्या फॉन्टमध्ये अंकांसह नंबर पॅनेल असेल.
खाली उजवीकडे रंग बदलणाऱ्या शाईमध्ये (हिरव्या ते निळ्या) रुपयाच्या चिन्हासह (₹500) मूल्यांक असेल. PIB fact Check

How to fake news fact check website pibfactcheck in is falsely claiming to  be the official website of pibfactcheck | Fake News की फैक्ट चेक करने वाली  सरकारी एजेंसी PIB को भी

PIB Fact Check म्हणजे काय ???

PIB Fact Check ही भारत सरकारची अधिकृत फॅक्ट चेक करणारी संस्था आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक वेळा चुकीच्या बातम्या व्हायरल होऊ लागतात. अशा परिस्थितीत, पीआयबी फॅक्ट चेक अशा बातम्यांची पडताळणी करते आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा प्रसार रोखते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://pib.gov.in/factcheck.aspx

हे पण वाचा :
Atal Pension Yojana मध्ये पैसे जमा करता येत नसतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम
Suryoday Small Finance Bank च्या FD वर मिळेल 9% पेक्षा जास्त व्याज
Gold Price : सोने चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
UPI Transaction Limit : UPI द्वारे पैसे पाठवण्याचे लिमिट किती आहे ते जाणून घ्या
PAN-Aadhaar Link : 31 मार्चपर्यंत ‘हे’ काम करा अन्यथा पॅन कार्ड होईल निष्क्रिय