Pik Vima : 1 रुपयात पीक विमा योजनेचा असा घ्या लाभ; ‘या’ कागदपत्रांची पडेल आवश्यकता

Pik Vima 1 Rupee
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा (Pik Vima) योजना जाहीर केला आहे. त्यामुळे आता शेतकरी फक्त एक रुपयात पिक विमा घेऊ शकणार आहेत. या योजनेसाठी तब्बल 3312 कोटी रुपयांची तरतूद सरकारकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये या नविन योजनेची माहिती दिली आहे. परंतु या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे? तसेच ही योजना कोणकोणत्या पिकांसाठी लागू असेल? याबाबत अनेकाना माहित नाहीत. त्यामुळे आज आपण हीच माहीती जाणून घेणार आहोत.

कोणकोणती कागदपत्रे लागतील ?

सरकारच्या या योजनेचा लाभ (Pik Vima) घेण्यासाठी सर्वात अगोदर अर्ज भरणे गरजेचे आहे. हा अर्ज भरत असताना त्यासाठी पीकपेरा स्वयं घोषणापत्र, सातबाराचा उतारा, आधार कार्डशी संलग्न बँकेचे पासबूक, सामाईक खातेदार असल्यास द्यावयाचे संमतीपत्र असे कागदपत्र आवश्यक असणार आहेत.

या अर्जामध्ये सुरुवातीला तुमचे नाव आणि पत्ता यासंदर्भात माहिती भरावी लागणार आहे. तसेच पुढे ८ अ उताऱ्याप्रमाणे तुमच्या गावाचे नाव, तुमच्या नावावर असलेले एकूण क्षेत्र याबाबत माहिती भरावी लागेल. तसेच पिक कोणते आहे याची माहिती सुद्धा द्यावी लागणार आहे. सगळ्यात शेवटी आधार कार्ड नंबर, बँकेची माहिती, मोबाईल नंबर अशी सर्व माहिती भरावी लागेल.

कोणकोणत्या पिकांचा समावेश? (Pik Vima)

या अर्जामध्ये बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, मका ही पीक देण्यात आली आहेत. त्यामुळे आपले पिक निवडून हा फॉर्म भरण्यात यावा. राज्य सरकारकडून ही योजना खरीप हंगाम, रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून सर्व सरकारी योजनांना अगदी घरबसल्या अर्ज करून आर्थिक लाभ मिळवता येतोय. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करावा लागत नाही. याव्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, सर्व पिकांचे रोजचे बाजारभाव आदी सुविधाही फुकटमध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi डाउनलोड करा आणि या सर्व सुविधांचा लाभ घ्या.

कधीपर्यंत अर्ज भरता येणार?

खरीप हंगामातील पिकांना पीक विमा घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत पीक विमा संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. रब्बी हंगामातील पिकांना पीक विमा घेण्यासाठी ३० नोव्हेंबपर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.