धक्कादायक ! आईला रुग्णालयात नेणार्‍या तरुणीचा अ‍ॅम्बुलन्स चालकानेच केला विनयभंग

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक तरुणी आपल्या आईला वाय सी एम हॉस्पिटलमधून आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होती. किशोर पाटील या अ‍ॅम्बुलन्स चालकाने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एका २२ वर्षाच्या तरुणीने पिंपरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हि घटना २५ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली होती.

काय आहे प्रकरण
फिर्यादी तरुणीची आई आजारी असल्याने तिला वाय सी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला वाय सी एम रुग्णालयातुन थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार होते. त्यामुळे त्यांना किशोर पाटील याच्या अ‍ॅम्बुलन्समधून नेण्यात येणार होते. यावेळी पाटील याने आईस अ‍ॅम्बुलन्समधून खाली उतरविल्यास त्यांच्या जीवाचे बरेवाईट होईल अशी भिती त्या तरुणीला दाखवली. त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्याकडून पैसे घेतले व त्यांच्याकडून पैसे घेताना वेगळ्या नजरेने पाहून त्यांचा हात धरुन ठेवला. त्यानंतर त्या मुलीने त्याचा हात झटकला.

यानंतर किशोर पाटीलने फिर्यादीला ‘‘चार आणेची मुलगी बारा आणेका मसाला’’ असे उद्देशून बोलून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी आई आजारी असल्याने त्या तरुणीने घाबरून तक्रार केली नव्हती. यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी यावर कारवाई करत किशोर पाटील या अ‍ॅम्बुलन्स चालकाला अटक केली आहे.