पिंपरी प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे
दोन वर्षांपूर्वी मान्यता देऊनही ‘पीमपी’ने वाहने खरेदी केली नाहीत. त्यामुळे हे वाहन खरेदीचे पाऊल उचलावे लागले असे पालिकेने मत मांडले आहे.
गाड्या कमी पडत असुन वाहतूकीवर त्याचा परिणाम होत आहे. त्यासाठी ‘पीएमपीएल’ यांच्या मागणीनुसार पिंपरी महापालिकेकडून गाड्यांची खरेदी करुन त्या ‘पीएमपीएल’ ला देण्यात याव्यात, असा प्रस्ताव महापौर राहुल जाधव यांच्या उपस्थिती मध्ये मांडून सभेने त्याला मंजुरी दिली.