धक्कादायक ! डान्स टिचरनेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पावडर मागण्याच्या बहाण्याने डान्स टिचरने अल्पवयीन मुलीला बाथरुममध्ये बोलावून तिच्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्या मुलीचा हाथ पकडून आपल्या प्रायव्हेट पार्टला हात लावायला लावून लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी संदीप जगदीश परदेशी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

हा सगळा प्रकार बुधवारी रात्री ९ वाजता फिर्यादीच्या घरी घडला. या प्रकरणी ३१ वर्षाच्या महिलेने हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्याकडे त्यांच्या गावाकडील एक मुलगी आली होती. काल रात्री संदीप परदेशी हा फिर्यादीच्या घरी आला होता. संदीप परदेशी हा डान्स टिचर आहे.

रात्रीच्या वेळी तो फिर्यादीच्या मुलीच्या बाथरुममध्ये गेला त्यांतर त्याने ड्रर्मीकुल पावडर मागण्याचा बहाणा केला. तो पावडर देण्यासाठी फिर्यादीच्या गावाकडील मुलगी तिकडे आली. त्यानंतर त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तसेच त्याने तिचा हात पकडून तो आपल्या प्रायव्हेट पार्टला लावला. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलिसांकडून करण्यात येत आहे.