मणक्याची नस दबली असल्यास दिसतात ही लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष

Spine
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांना अनेक प्रकारचे आजार व्हायला लागलेले आहेत. त्यातही आपल्या पाठीच्या मणक्याची शीर दबली जाणे ही सामान्य गोष्ट झालेली आहे. अनेक पुरुषांना तसेच स्त्रियांना या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्या पाठीच्या मणक्याची शीर दबली गेली असेल, तर त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींचा त्रास होत असतो. यामध्ये हाता पायाला मुंग्या येतात. स्नायू कमकुवत होतात. तसेच हात पाय देखील सुन्न पडत असतात. आता पाठीच्या मणक्याची शीर दबली असता; तुम्हाला काही लक्षणे दिसतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मणक्या भोवती वेदना होतात

तुमच्या पाठीची शीर जर दबली गेली असेल, तर त्या भोवती वेदना जाणवू शकतात. तसेच ही वेदना कमरेपासून पाठीपर्यंत जाते. तुमचा पाठीचा कणा वारंवार दुखत असेल तसेच तुम्हाला देखील अशा समस्या होत असेल, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हात पाय सुन्न होतात

जर तुमच्या पाठीची नस दबली गेली असेल, तर हात पाय देखील सुन्न होऊ शकतात. कारण यावेळी नसांमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. तसेच ऑक्सिजन आणि रक्त नीट पोहोचू शकत नाही. यावेळी हात आणि पाय सुन्न होतात.

पायांना मुंग्या येणे

जर तुमच्या पाठीशी नस दबली गेली असेल, तर त्या लोकांना पायांमध्ये मुंग्या येण्याची समस्या जाणवते. जर तुमची नस दबली गेली, तर रक्ताभिसरण नीट होत नाही. त्यामुळे पायाला व्यवस्थित रक्त न पोहोचल्यामुळे मुंग्या येण्याची समस्या उद्भवते.

स्नायू कमकुवत होतात

जर तुमच्या पाठीची नस दबली गेली असेल, तर रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. रक्त आणि ऑक्सिजनचा प्रभाव मिळत नसल्याने लोकांना अशक्तपणा येतो. आणि थकवा देखील जाणवू लागतो. ही अगदी सामान्य गोष्ट आहे. परंतु जर तुम्हाला देखील अशा समस्या जाणवत असेल, तर अजिबात दुर्लक्ष न करता त्याला डॉक्टरांशी संपर्क साधा योग्य उपचार चालू करा.