‘या’ मराठी माणसाने दिलीय भारताला पिनकोड सिस्टिम : जाणून घ्या तो कोण आहे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्याचा जमाना आॅनलाईनचा असला तरी पिनकोडची गरज आजही आपल्या सर्वांनाच भासते. बॅंक असो किंवा पोष्ट ऑफिस किंवा ऑनलाईन कुरिअर, आपल्याला तिथे पिनकोड हा टाकावाच लागतो. जर पिनकोड नसेल तर मागविलेल्या वस्तू, लेटर दिलेल्या पत्त्यावर पोहचू शकत नाहीत. विशेष म्हणजे पिनकोड नावाची संकल्पना ही एका मराठी माणसाने शोधून काढली आहे. पिनकोड मध्ये असं काय आहे की त्याशिवाय पत्रव्यवहार करता येत नाही? पत्ता लिहिलेला असताना पिनकोड टाकणे बंधनकारक का असते? या पिनकोडची निर्मिती कशी झाली? तो कोणी तयार केला?  असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. याबाबतच आज आपण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

श्रीराम वेलणकर यांनी आपलं सुपीक डोकं व आयडियाची कल्पना वापरुन पूर्ण भारताला पिनकोडची देणगी दिली आहे. PIN म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर्. हे घडलं १९७२ मध्ये. तोपर्यंत जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांची विभागवार विभागणी होत असे. पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या. म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाची गावं, कधी कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे, आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा, चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच. हे सगळं टाळण्यासाठी विभागवार पत्रांची विभागणी करण्यासाठी ही पिनकोड पद्धत अंमलात आणण्यात आली.

पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली. त्यामुळेच श्रीराम भिकाजी वेलणकर यांना ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं. पिनकोडच्या रचनेबाबत सांगायचं झालं तर पूर्ण देश ९ झोनमध्ये विभागला गेला आहे. यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत, तर एक मिलिट्रीसाठी वापरला जातो.

पिनकोड वाचायचीही खास पद्धत आहे ती म्हणजे पिनकोडमधील पहिले दोन अंक पोस्ट ऑफिस दर्शवतात. सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक दाखवतो- विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक – सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो. उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे. यात पहिला अंक दाखवतो- पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक – ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.

११ – दिल्ली
१२ व १३ – हरयाणा
१४ ते १६ – पंजाब्
१७ – हिमाचल प्रदेश्
१८ ते १९ जम्मू आणि काश्मिर्
२० ते २८ – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड
३० ते ३४ – राजस्थान्
३६ ते ३९ – गुजरात्
४० ते ४४ – महाराष्ट्र
४५ ते ४९ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड
५० ते ५३ – आंध्र प्रदेश
५६ ते ५९ – कर्नाटक
६० ते ६४ – तामिळनाडू
६७ ते ६९ – केरळ
७० ते ७४ – पश्चिम बंगाल्
५५ ते ७७ – ओरिसा
७८ – आसाम
७९ – पूर्वांचल
८० ते ८५ बिहार आणि झारखंड
९० ते ९९ – आर्मी पोस्टल सर्व्हिस्

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment