पियुष गोयल म्हणाले-“ई-कॉमर्स क्षेत्रासाठी सरकार FDI नियम बदलणार नाही”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले की,”सरकार ई-कॉमर्स क्षेत्रातील FDI चे सध्याचे धोरण बदलणार नाही. आपल्या मंत्रालयाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गोयल म्हणाले, “मला हे स्पष्ट करायचे आहे की, ई-कॉमर्समधील FDI च्या धोरणात आम्ही काही बदल करणार नाही. आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्ही ते लवकरच सोडवू.”

ऑनलाईन व्यवसाय करणार्‍या अनेक कंपन्यांशी सरकारचा संघर्ष आहे. गोयल म्हणाले होते की,” परदेशी ई-कॉमर्स कंपन्या लाखो लोकांच्या जगण्याला धोका बनत आहेत. सध्याचे धोरण ई-कॉमर्सच्या मार्केटप्लेस मॉडेलमध्ये 100% FDI ला परवानगी देते. तथापि, इनवेंटरी असलेल्या मॉडेलसाठी हे लागू नाही. सरकारने अनेक प्रेस नोट्स आणि अधिसूचनांच्या माध्यमातून ई-कॉमर्स कंपन्यांसाठी इनवेंटरी ठेवण्यास बंदी घातली आहे.

आमच्यासाठी आमचे सर्वात महत्त्वाचे स्टेकहोल्डर ग्राहक आहेत
ई-कॉमर्स पॉलिसी अंतिम करण्याबाबत विचारले असता, गोयल म्हणाले की,”सरकारने नुकतेच ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत नवीन ई-कॉमर्सचे नियम जाहीर केले आहेत. हे नियम 6 जुलै पर्यंत सार्वजनिक चर्चेसाठी खुले आहेत.” गोयल म्हणाले की, “आम्हाला ग्राहक संरक्षण नियम पहिले आणायचे आहेत कारण आमचा विश्वास आहे की, आमचा सर्वात महत्त्वाचा भागधारक ग्राहक आहेत. आम्ही ग्राहक संरक्षणाला प्राधान्य दिले आहे हे सुनिश्चित करू इच्छितो.”

आधीच कडक सूचना दिल्या आहेत
पियुष गोयल यांनी काही दिवसांपूर्वीच ई-कॉमर्स कंपन्यांबद्दल कठोर वृत्ती दर्शविली होती. 27 जून रोजी त्यांनी म्हटले होते की, अनेक ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात गर्व करीत आहेत आणि ते जाणूनबुजून भारतीय कायदे मोडत आहेत. त्यांनी सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना देशाच्या कायद्याचे पूर्ण पालन करावे लागेल अशा कडक सूचना दिल्या आहेत. तसेच परदेशी ई-कॉमर्स कंपन्यांनी भारतीय हितसंबंधांचे नुकसान करण्यासाठी मनी पॉवरचा वापर करण्यास टाळावे, असेही ते म्हणाले. अनेक मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांचे उपक्रम ग्राहकांच्या हिताच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते. हे लक्षात घेता केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्या किंवा अशा बाजारपेठेच्या मॉडेल्ससाठी काही नवीन नियम तयार केले आहेत, जे भारतीय आणि विदेशी कंपन्यांना तितकेच लागू असतील.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment