भररस्त्यात चौघींकडून तरुणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

pizza chain employee thrashed by 4 women
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये इंदूर शहरातील द्वारकापुरी भागात पिझ्झा चेनमध्ये काम करणाऱ्या तरुणीला रस्त्यावर मारहाण (pizza chain employee thrashed by 4 women) करण्यात आली आहे. आपल्याकडे पाहत असल्याचा आरोप करत चार जणींनी मिळून पीडित तरुणीला बेदम मारहाण (pizza chain employee thrashed by 4 women) केली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून चारही तरुणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण इंदूरच्या द्वारकापुरी भागातील आहे. ज्या ठिकाणी पिंकी आणि तिच्या टोळीची दहशत आहे. या व्हिडिओमध्ये चार आरोपी तरुणी पीडित मुलीला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण (pizza chain employee thrashed by 4 women) करताना दिसत आहेत. या मारहाणीनंतर पीडित तरुणी रस्त्यावर पडली आणि लोकांकडे मदत मागत राहिली. मात्र तिच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. यानंतर पीडित महिलेने समोरच्या एका घरात जाऊन आपला जीव वाचवला.

ही घटना शनिवारी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या लेडी गँगने मारहाणीचा (pizza chain employee thrashed by 4 women) व्हिडिओ स्वतःच बनवून व्हायरल केला आहे. पीडित नंदनी यादवच्या तक्रारीवरून पिंकी आणि तिच्या तीन मैत्रिणींविरोधात मारहाणीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी सतीश द्विवेदी यांनी दिली आहे.

पीडित तरुणी फूड कंपनी डॉमिनोजमध्ये काम करते. शनिवारी ती कामावर जाणार होती. इतक्यात पिंकी आणि तिच्या तीन मैत्रिणींनी येऊन तिचा रस्ता अडवला. यानंतर बोलण्यास सांगून जवळ बोलावून लाथा-बुक्क्यांनी तिला मारहाण (pizza chain employee thrashed by 4 women) केली. तू आमच्याकडे का बघत होतीस, असा सवाल करत त्यांनी पीडित तरुणीला मारहाण केली अशी माहिती पीडित तरुणीने दिली आहे.

हे पण वाचा :
ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे…; मनसेचा शिवसेनेला टोला

मामे भावाने 13 वर्षीय मुलीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य, अशा प्रकारे झाला खुलासा

चालत्या रिक्षातून अचानक खाली पडला चिमुकला; मागून वेगात आली बस अन्…

खुशखबर !!! Aadhar Card संबंधित सर्व सेवा आता घरपोच मिळणार !!!

शरद पवार यांना राष्ट्रपती करू नये; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने सांगितली कारणे