हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या ते मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत आहेत. यादरम्यान त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचा एक डोस देण्यात आला होता. यानंतरही आजही त्यांना आणखी एक डोस देण्यात आल्याचे सांगितले जाते.
देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत आहे. काही तासांपूर्वी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही 93 पर्यंत खाली घसरली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 97 पर्यंत वाढली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जळगावच्या दौऱ्यावर असताना फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना सांगितले होते की, जर मला कोरोनाचा संसर्ग झाला तर मी सरकारी रुग्णालयातच उपचार घेणार. आपले शब्द खरे करत फडणवीस सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल झाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’