कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग, आण्णासो शिंदे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमनाने व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आज लक्षतीर्थ वसाहत येथे प्लॅस्टिक मुक्त जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ नगरसेविका सौ.अनुराधा खेडकर यांच्या हस्ते आण्णासो शिंदे विद्यालय पासून करण्यात आला.
या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थीनी प्लॅस्टिक हटाव देश बचाव, कापडी पिशवी घरो घरी पर्यावरणाचे रक्षण करी, प्लॅस्टिक मध्ये नाही शान मिटवून टाकू नामोनिशान, प्लॅस्टिकचा वापर सोडा पर्यावरणाशी नाते जोडा अशा विविध घोषणा देवून याविषयी नागरिकांचे व व्यापा-यांचे लक्ष वेधून घेतले. तसेच प्रमूख चौकामध्ये विद्यार्थी व शिक्षकांकडून प्लॅस्टिक बंदीबाबत पथनाटय सादर करण्यात आले. तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत ई वॉर्ड न्यू शाहुपूरी येथील गुरुवर्य आबासो सासाने विद्यालय येथे परिसरातील प्लॅस्टिक कचरा वेचा मोहिम राबवीण्यात आली. या मोहिमे अंतर्गत शालेय विद्यार्थ्यानी संपुर्ण परिसरातील प्लॅस्टिक कचरा वेचून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे देण्यात आला.
यावेळी आरोग्य निरिक्षक आरविंद कांबळे, नंदकुमार पाटील, माहिती शिक्षण व संव्वाद अधिकारी निलेश पोतदार,स्वच्छता दुत अमित देशपांडे, अण्णासो शिंदे विद्या मंदिरच्या मुख्याध्यापीका नलीनी सांळूखे, आबासो सासाने विद्यसालयाच्या मुख्याध्यापीका सौ. नयना बडकस, शाळेतील शिक्षिका वैशाली कोळी, नर्मदा नाडेकर, कविता रावळ,मिनाज मुल्ला, दिपाली कोरे, शिक्षक सुधाकर सावंत, रविंद्र पाटील, मजिद नदाफ,रघुनाथ मैहतर, चरनसिंग रजपुत,विनोदकुमार भोम, विद्यार्थी-विद्यार्थींनी, महापालिकेचे कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.