हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला १४ जून(काल) एक वर्षे पूर्ण झाले. सुषणात अनेको प्रेक्षकांचा अत्यंत लाडका कलाकार होता. अगदी तेव्हाही आणि आताही. आजही त्याची जागा त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम आहे. मात्र आता उरल्या आहेत त्या फक्त आणि फक्त त्याच्या आठवणीं. दरम्यान त्याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती त्याच्या आठवणींनी व्याकुळ झाली आणि तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रियाने इंस्टाग्रामवर सुशांत आणि तिचा फोटो शेअर करत ही पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CQGK6hgHldL/?utm_source=ig_web_copy_link
रियाने तिचा आणि सुशांतचा फोटो शेअर करत इंस्टाग्रामवर लिहिले की, एक क्षणदेखील असे वाटले नाही की आता तू नाही आहेस, लोक म्हणतात की वेळ सर्व काही ठीक करते, माझ्यासाठी तूच माझा वेळ आणि माझे सर्व काही होतास. मला माहित आहे की वरून तू मला पाहत आहेस, चंद्रावरून तू मला तुझ्या दुर्बीणीतून पाहत आहेस आणि माझी रक्षा करत आहेस. मी दररोज तू मला घ्यायला येशील म्हणून वाट पाहत असते. मी तुला सगळीकडे शोधत असते. मी दररोज कोलमडून जाते. मग मला तू सांगितलेली गोष्ट आठवते. तु मला सांगायचास की, तुझ्याकडे हा बेबू आहे आणि मग मी स्वतःला पुढील दिवसासाठी तयार करायचे. जेव्हा मला वाटते की तू इथे नाही आहेस, तेव्हा भावनांचे एक बंधन माझ्या शरीराला पार करतात. हे सर्व लिहिताना माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत.
https://www.instagram.com/p/CCnBR95HAmO/?utm_source=ig_web_copy_link
रिया पुढे म्हणाली की, तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. तू माझे जीवन तुझ्यासोबत घेऊन गेला आहेस. ती पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरून निघू शकत नाही. मी तुझ्याशिवाय आजही एकटी उभी आहे. माझा प्रिय सनशाईन, मी आजही तुला दररोज मालपुआ खाऊ घालण्याचे वचन देते आणि फिजिक्सचे पुस्तक वाचते. प्लिज माझ्याकडे परत ये. मला तुझी खूप आठवण येते.. माझा मित्र, माझे प्रेम.. बेबू आणि पुटपुट नेहमीसाठी…मनापासून.. अश्या आशयाची पोस्ट लिहून रियाने आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे.
https://www.instagram.com/p/B7ke6FRnEJl/?utm_source=ig_web_copy_link
रिया सुशांतच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती होती. ती सुशांतसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होती. त्यामुळे सुशांतच्या निधनानंतर उभ्या राहिलेल्या केसमध्ये तिची बऱ्याचदा चौकशी करण्यात आली. सुशांतच्या वडिलांनी तिच्यावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आणि १५ कोटी बळकावल्याचा आरोप केला होता. सुशांतच्या निधनानंतर तिच्यासाठी बऱ्याच गोष्टी बदलल्या. या प्रकरणात तिला अटक करण्यात आली होती. मात्र यानंतर तिची जामिनारवर सुटका झाल्याने ती अटकेतून बाहेर आहे मात्र आरोपांतून तिची सुटका झालेली नाही. यामुळे अजूनही अनेकदा तिची चौकशी केली जाते.