मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात फरफट : झेडपीची पोरं 15 वर्षापासून धावतायत अनावणी रस्त्यावर

Competition Road Satara
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मैदानी स्पर्धा राबविताना चक्क मैदान नेमकं गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे. गेल्या 15 वर्षापासून जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या स्पर्धा या महामार्गावर घेतल्या जात आहेत. वनवास 14 वर्षाचा असतो, तो पूर्ण झाला तरी झेडपीच्या शाळेच्या पोरांना अनवाणी रस्त्यावर मैदानी स्पर्धासाठी जीव धोक्यात घालून धावावे लागत आहे.

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या या शाळाच्या धावण्याच्या स्पर्धा चक्क महामार्गावर सुरू आहेत. त्यामुळे चिमुकल्यांच्या जीवासोबत शिक्षण विभागाचा खेळ सुरू आहे. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मैदान नसल्याने स्पर्धा राष्ट्रीय महामार्गावर घेण्याची वेळ आली आहे. गेल्या पंधरा वर्षापासून या स्पर्धा याच राष्ट्रीय महामार्गावर घेत आहेत. जावली तालुक्यातील सुमारे 200 पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळा मधील 250 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तेव्हा नक्की मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील मैदान नेमकी गेली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मैदान नसल्याने महामार्गावर स्पर्धा विस्ताराधिकारी 
जावली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या धावण्याच्या स्पर्धा या मैदान नसल्यामुळं आम्हाला महामार्गावर घ्याव्या लागत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासुन याच रोडवर या स्पर्धा घेण्यात येत आहेत. आता महामार्ग मोठा झाल्यामुळे धोका आहे, मात्र मैदान नसल्यामुळं या ठिकाणीच स्पर्धा घ्याव्या लागतात. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना हक्काचं मैदान मिळावं, अशी गेल्या अनेक वर्षांपासुन मागणी असल्याचे विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे यांनी सांगितले.