PM Kisan मध्ये काही शेतकऱ्यांना पुढील हप्त्यात 2 हजारांऐवजी मिळतील 4 हजार रुपये !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा फायदा देशातील 10 कोटींहून जास्त शेतकऱ्यांना होतो आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन-दोन हजार रुपयांचे एकूण 11 हप्ते दिले गेले आहेत. आता लवकरच सरकार कडून 12 वा हप्ता देखील देण्यात येणार आहे.

What is PM-Kisan Samman Nidhi Yojana? Check Registration Process, Eligibility, Documents Required, Toll-free Number and More

या योजनेचा 12 वा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला दिला जाऊ शकेल असा दावा एका मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेला आहे. मात्र, सरकारकडून अधिकृतपणे याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. 31 मे रोजी सरकारने 11व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून एका वर्षात सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. PM Kisan

PM Kisan Samman Nidhi Yojana 11th Installment: 5 Reasons Why There Can Be A Delay In Receiving Money

दिले जाऊ शकतील दोन हप्त्यांचे पैसे

हे लक्षात घ्या कि, अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 11व्या हप्त्याचे पैसे अजूनही आलेले नाहीत. यामागे अनेक कारणे आहेत. ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, त्यांना आता 12 व्या हप्त्यासोबत 11 व्या हप्त्याचे पैसेही मिळतील. अशाप्रकारे, यावेळी सरकार त्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांऐवजी 4 हजार रुपये दिले जाऊ शकतील. PM Kisan

यहाँ देखे- Pm Kisan Application Status Pmkisan.gov.in

‘या’ कारणांमुळे थांबवला जाऊ शकेल हप्ता

हप्ता थांबवण्यामागे अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, पीएम किसान योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करताना कोणतीही माहिती भरण्यात चूक करणे, पत्ता किंवा बँक खात्याची संबंधित माहिती चुकीची भरणे. याशिवाय राज्य सरकारकडून दुरुस्ती प्रलंबित असेल तरीही पैसे येणार नाहीत. याशिवाय, आधार सीडिंग नसेल तसेच पब्लिक फायनान्शिअल मॅनेजमेंट सिस्टीम (PFMS) रेकॉर्ड स्वीकारत नसेल किंवा बँकेची रक्कम इनव्हॅलिड असेल तरी देखील NPCI मध्ये देखील पैसे अडकू शकतील. आपण भरलेली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट http://pmkisan.gov.in ला भेट देता येईल. PM Kisan

PM Kisan पीएम किसान योजना में बड़ा बदलाव!

अशा प्रकारे तपासा

सर्वांत आधी http://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
येथे उजव्या बाजूला फॉर्मर कॉर्नर लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
त्यानंतर बेनिफिशियरी स्‍टेटसवर क्लिक करा.
यानंतर आधार नंबर, अकाउंट नंबर आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल.
आधार नंबरटाका आणि Get Data वर क्लिक करा.
येथे तुमची सर्व माहिती आणि मिळालेल्या पीएम किसानच्या हप्त्यांचा तपशील दिसेल.
दिलेली सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते येथे तपासा.
जर काही माहिती चुकीची असेल तर ती येथे दुरुस्त करता येईल. PM Kisan

हे पण वाचा :

ITR refund संबंधित महत्वाचे 5 नियम समजून घ्या !!!

Multibagger Stock : या 5 शेअर्सनी एका वर्षात दिला चार पट रिटर्न !!!

Sukanya samriddhi yojana च्या व्याजाशी संबंधित ‘हा’ नियम जाणून घ्या !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा

Indian Railway कडून 120 गाड्या रद्द , अशा प्रकारे चेक करा लिस्ट !!!