PM Kisan Mandhan Scheme : वृद्धापकाळात पैशांची चणचण होणार दूर ; दरमहा सरकार देणार पेन्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan Mandhan Scheme : खरंतर वृद्धपकाळात आपण कोणावर अवलंबून राहू नये. वृद्धपकाळात कोणापुढे हात पसरण्याची गरज लागू नये अशी इच्छा अनेकांची असते. म्हणूनच सामान्य माणसाच्या वृध्दापकाळाचा विचार करत वृद्ध नागरिकांसाठी सरकार अनेक योजना राबवत असते. आजच्या लेखात आपण अशाच एका योजनेची माहिती घेणार आहोत. त्यातही शेतकऱ्याच्या दृष्टीने सरकारने अनेक यशस्वी योजना सुरु केल्या आहेत. आज आपण ज्या योजनेची माहिती घेणार आहोत ती योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री किसान मानधन’ योजना. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना (PM Kisan Mandhan Scheme) दरमहा ३ हजार रुपये पेन्शन देत आहे. ही किमान पेन्शन आहे.

या योजनेत योगदानासाठी किमान आणि कमाल मर्यादा आहे. त्यानुसार शेतकर्‍यांची पेन्शन (PM Kisan Mandhan Scheme) 60 वर्षांनंतर ठरविली जाते. एव्हढेच नाही तर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, शेतकऱ्याच्या पत्नीला कौटुंबिक पेन्शनच्या 50 टक्के रक्कम मिळण्यास पात्र असेल. कौटुंबिक पेन्शन योजना फक्त पती-पत्नीसाठी लागू आहे. या योजनेत मुले लाभार्थी म्हणून पात्र नाहीत. चला तर मग जाणून घेऊया या योजनेविषयी…

काय आहे पीएम किसान मानधन योजना ? (PM Kisan Mandhan Scheme)

पीएम किसान मानधन (PM Kisan Mandhan Scheme) ही केंद्र सरकारची योजना आहे. वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतो. वयानुसार मासिक योगदान देणार्‍याला 60 वर्षानंतर मासिक 3000 रुपये किंवा वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळेल. यासाठी लाभार्थ्याला दरमहा 55 ते 200 रुपयांपर्यंत पैसे भरावे लागतील. ही रक्कम सदस्यांच्या वयावर अवलंबून असते.

दरमहा मिळतील तीन हजार रुपये

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३,००० रुपये पेन्शन मिळेल. पेन्शन (PM Kisan Mandhan Scheme) घेताना लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास. या स्थितीत त्यांच्या पत्नीला दरमहा 1500 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे.

कोण घेऊ शकते योजनेचा लाभ ?

तुम्हालाही या योजनेचा लाभ (PM Kisan Mandhan Scheme) घ्यायचा असेल तर प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अर्ज करा. मात्र तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, ओळखपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शेतातील खसरा खतौनी, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.