हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेली शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Scheme) केंद्र सरकारकडून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रति वर्षाला 6000 रुपये दिले जातात. प्रत्येकी 2000 या प्रमाणे एकूण 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम ट्रान्सफर (Direct benefit Transfer)केली जाते. हे हप्ते एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये पाठवले जातात. आतापर्यंत सरकारडून दोन हप्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहेत तर तिसरा हप्ता डिसेंबर 2020 मध्ये पाठवण्यात येणार आहे.
पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत हा लाभ मिळवण्यास तुम्ही पात्र शेतकरी असाल तर याकरता नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतकच तुमच्या खात्यामध्ये हे 2000 रुपये जमा होतील. या योजनेत रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. यानंतर तुम्हाला घरबसल्या लाभ मिळू शकतो.
योजनेसाठी अशी करा तुमच्या नावाची नोंदणी
-https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा आणि त्याठिकाणी असणाऱ्या Farmer Tab वर क्लिक करा
-pmkisan.gov.in या वेबसाईटवर तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे देखील तपासू शकता
-Farmer Tab वर क्लिक करून याठिकाणी जाऊन तुम्ही या योजनेत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही लाभार्थी असाल तर तुमची स्थिती देखील तपासून पाहू शकता.
-फार्मर टॅबवर new registration वर क्लिक करून नवीन अर्ज करता येईल
-त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला आधार नंबर एंटर करावा लागेल.
याशिवाय शेतकऱ्यांना नाव, जेंडर, श्रेणी, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, पत्ता, मोबाइल नंबर, जन्मतिथी इत्यादी माहिती द्यावी लागेल
-त्याचप्रमाणे जमीनाची आवश्यक कागदपत्रे देखील द्यावी लागतील
-सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह पर्यायावर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर त्यांची जमीन असली पाहिजे. सरकारी कर्मचारी किंवा सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या व्यक्तीला देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला मासिक पेन्शन 10 हजार मिळत असेल तरी देखील त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’