Pm Kisan Scheme: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून 2 हजार रुपये होणार जमा; पैसे आले कि नाही असं करा चेक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Scheme) योजनेचा सातवा हप्ता उद्या म्हणजेच 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान योजनेच्या सातव्या हप्त्याद्वारे मोदी सरकार 25 डिसेंबरला सुमारे 18,000 कोटी रुपये देणार आहे. या योजनेत वर्षातून तीन वेळा 2 हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आपल्या खात्यात पैसे येणार की नाही हेसुद्धा आता समजणार आहे. (Pm Kisan Samman Nidhi Rs 2000 Installment)

पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. मात्र, यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक असणं आवश्यक आहे.

आपल्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासणार?
पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे आले का हे तुम्ही सहजपणे तपासू शकता.
तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील….
सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सम्मान निधीचं होमपेज दिसेल.
होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
तिथे स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल.

मंत्रालयाशी संपर्क साधण्याचीही सुविधा
मोदी सरकारची ही सर्वात मोठी शेतकरी योजना असल्याने शेतकर्‍यांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यात एक हेल्पलाईन नंबर आहे. ज्याद्वारे देशातील कोणत्याही भागातील शेतकरी थेट कृषी मंत्रालयाशी संपर्क साधू शकतात.
पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक: 155261
पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401
पंतप्रधान किसन यांची नवीन हेल्पलाईन: 011-24300606
पंतप्रधान किसन यांची आणखी एक हेल्पलाईन आहे: 0120-6025109
ईमेल आयडी: [email protected]

शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6 हजार जमा
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) या योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत शेतक-यांना सहा हप्ते पाठवण्यात आले आहेत. गेल्या 23 महिन्यांत केंद्र सरकारने 11.17 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर 95 कोटी रुपयांहून अधिक मदत जमा केली आहे. सातव्या हप्त्याचा लाभसुद्धा 11.17 कोटी नोंदणीकृत शेतकर्‍यांना मिळणार आहे. मात्र, त्यांची कागदपत्रे बरोबर असणं आवश्यक आहे. जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही. रेकॉर्डमध्ये काही गडबड असल्यास आपल्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. काही शेतकर्‍यांना अर्ज करूनही पैसे मिळालेले नाहीत, कारण एकतर त्यांची नोंद चुकीची आहे किंवा आधारकार्डची माहिती उपलब्ध नाही. तर काहींच्या नावामध्ये गडबड असल्यानं पैसेदेखील थांबवण्यात आलेले आहेत.

नवीन शेतकर्‍यांची नोंदणी कशी करावी ?
जर तुम्ही अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळविण्यासाठी नोंदणी केली नसेल तर आताही नोंदणी करून तुम्हाला फायदा मिळवता येऊ शकेल. सर्व प्रथम, आपल्याला या योजनेशी संबंधित अधिकृत साइटवर जावे लागेल. ज्यामध्ये शेतकरी कॉर्नरचा पर्याय दिसेल. नवीन शेतकरी नोंदणी टॅबवर क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये आपल्याला आधार कार्डचा तपशील भरावा लागेल. ते भरून झाल्यानंतर दुसरे पान तुमच्यासमोर उघडेल, जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल, तर तुमची माहिती येईल आणि तुम्ही पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर असे लिहिलेले येईल की RECORD NOT FOUND WITH GIVEN DETAILS, DO YOU WANT TO REGISTER ON PM-KISAN PORTAL. तुम्हाला पंतप्रधान किसान पोर्टलवर नोंदणी करायची आहे का? यावर आपल्याला होय करावे लागेल.

यानंतर फॉर्म दिसेल जो भरावा लागेल. त्यामध्ये योग्य माहिती भरल्यानंतर ती सेव्ह करा. यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये आपल्यास आपल्या जमिनीच्या सातबाराचा तपशील विचारला जाईल. विशेषत: सातबारावरील गट क्रमांक आणि खाते क्रमांक भरावे लागणार आहे. आपण जतन करताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment