‘आर्ची’ला लॉकडाउनचा फटका! शूटिंगसाठी गेलेली रिंकू राजगुरू लंडनमध्ये अडकली

लंडन । ‘छूमंतर’ सिनेमाच्या शूटिंगनिमित्त इंग्लंड दौऱ्यावर असलेली सैराट फेम ‘आर्ची’ म्हणजेचअभिनेत्री रिंकू राजगुरुला (Rinku Rajguru) लॉकडाऊनचा फटका बसला. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रिंकूला लंडनमध्येच थांबून राहावे लागत आहे. रिंकूसोबत ‘छूमंतर’ सिनेमाची टीमही इंग्लंडमध्येच आहे.

समीर जोशी दिग्दर्शित ‘छूमंतर’ सिनेमाचे चित्रिकरण इंग्लंडमध्ये सुरु आहे. यामध्ये रिंकू राजगुरुसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, रिषी सक्सेना, ‘नाळ’ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळेही तिथे शूटिंग करत आहेत. गेल्या महिन्यापासून लंडनमध्ये सिनेमाचे शूटिंग सुरु होते.

आर्चीची पहिली इंटरनॅशनल ट्रीप
रिंकू राजगुरुची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ट्रीप आहे. “मुंबई ते लंडन प्रवासादरम्यान मी प्रचंड एक्साईट होते. विमानतळांवर कोरोनापासून बचाावासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे.” अशी प्रतिक्रिया रिंकूने दिल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये पाहायला मिळालं. रिंकूने सोशल मीडियावरही काही फोटो शेअर केले आहेत. (Rinku Rajguru stuck in London due to Second Corona strain Lockdown in UK)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

You might also like