PM Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सामना निधी योजनेच्या 16व्या हप्त्याची तारीख समोर आली आहे. त्यानुसार, येत्या २८ फेब्रुवारीला केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २००० रुपये जमा करेल. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा आणि शेती करत असताना आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ही महत्वाकांक्षी योजना राबवली आहे. आत्तापर्यंत पीएम किसान योजेनच्या माध्यमातून १५ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहे. आता 16 वा हप्ता २८ तारखेला मिळणार असून पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेच्या माध्यमातून दरवर्षी, केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येकी २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात. देशातील तब्बल ११ कोटी पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. आत्तापर्यंत पीएम किसान योजनेचे 15 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता 16 वा हप्ता २८ तारखेला शेतकऱ्यांना मिळणार आहे.
पीएम किसान लिस्टमध्ये तुमचे नाव कस चेक कराल – PM Kisan Yojana
सर्वात आधी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
येथे तुमच्या उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर पहा. त्यातील लाभार्थी यादीवर क्लिक करा.
तुम्हाला एक नवीन विंडो उघडेल, जिथे तुम्हाला आजची अपडेटेड यादी मिळेल.
यासाठी, नियुक्त केलेल्या ठिकाणी तुमचे राज्य, जिल्हा, तालुकाआणि गाव निवडा. यानंतर Get Report वर क्लिक करा.
आता तुमच्या गावाची संपूर्ण यादी तुमच्या समोर असेल.
तुमचा स्टेट्स असा चेक करा
पीएम किसान योजनेचे तुमचे कोणते हप्ते मिळाले आहेत किंवा मिळाले नाहीत? जर तुमचे पैसे यायचे थांबले असेल तर यामागील कारण काय?? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुमची लाभार्थी स्थिती तपासा.
त्यासाठी Farmer Corner वर Know Your Status वर क्लिक करा.
येथे तुम्हाला एक नवीन विंडो उघडलेली दिसेल. दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा नोंदणी क्रमांक टाका. कॅप्चा कोड भरा आणि Get OTP वर क्लिक करा.
आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाकून तुमचा स्टेट्स चेक करा.
जर तुम्हाला नोंदणी क्रमांक माहित नसेल तर वरील निळ्या पट्टीवर तुमचा नोंदणी क्रमांक लिहिला जाईल हे जाणून घ्या. त्यावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक किंवा लिंक केलेला मोबाईल क्रमांक टाका. कॅप्चा कोड टाकून नोंदणी क्रमांक मिळवा आणि स्टेप-1 फॉलो करा.