PM Kisan Yojana | ‘या’ दिवशी येणार PM किसान योजनेचा 19 वा हप्ता; तारीख आली समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan Yojana | केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. आपल्या भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे सरकार देखील देशातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतात. त्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी अनेक प्रयत्न देखील करत असतात. अशातच काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. आणि ती योजना खूप लोकप्रिय झाली. या योजनेचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) असे आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षाला 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे जवळपास 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या आहेत. आणि आता पुढचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? याची सगळेजण वाट पाहत आहेत.

याआधी 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. जवळपास 9.4 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. आणि आता लवकरच या योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.

या योजने अंतर्गत 6 हजार रुपये दर वर्षाला 3 समान हप्त्यांमध्ये दिली जातात. ही रक्कम एप्रिल – जुलै, ऑगस्ट- नोव्हेंबर तसेच डिसेंबर – मार्च या तीन महिन्यांमध्ये दिले जाते. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार आपण सन्मान योजना 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजना ही जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना बनलेली आहे.

या योजनेचा लाभ आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळालेला आहे. परंतु जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी इ केवायसी केलेले नसेल, तर तुम्ही ते इ केवायसी करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही केवायसी केले नाही, तर पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यातील येणार नाही. यासाठी तुम्हाला एम किसान पोर्टलवर जाऊन ई केवायसी करावी लागेल. नंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.