PM kisan Yojana 2024 | मागील महिन्यात म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. या हप्त्याअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळालेले आहेत. अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधानांचा त्यांच्या खात्यावर पैसे आल्याचा मेसेज आलेला आहे. परंतु त्यांच्या खात्यात प्रत्यक्षात 2 हजार रुपये जमा झाले नसल्याचा प्रकार समोर आलेला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केलेली आहे. तरी देखील त्यांना अजून या पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. अनेक शेतकरी महसूल आणि कृषी प्रशासनाकडे देखील जात आहेत. परंतु त्यांना बेजबाबदारपणे उत्तर मिळत आहेत.
शेतकऱ्यांना मिळाला नाही पीएम किसान योजनेचा लाभ
पीएम किसान योजनेच्या 16 व्या हफ्त्यादरम्यान अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेला मेसेज मोबाईलवर आलेला आहे. परंतु त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात. 2 हजारांच्या समान रकमेने 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. परंतु आत्ता यावेळी खूपच मोठा प्रचंड गोंधळ झालेला दिसत आहे.
प्रशासनाकडून मिळाली बेजबाबदार उत्तरे | PM kisan Yojana 2024
लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने फेब्रुवारी महिन्यातच 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे. तरी देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या योजनांचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार देखील केलेली आहे परंतु त्यांना याचा काहीच लाभ मिळालेला नाही.
आयटी रिटर्न भरणाऱ्यांची माहिती नाही
याआधी आयटी रिटर्न भरणाऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्याचा आदेश सरकारने दिलेली होते. परंतु यासाठी पात्र असणारे लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती जिल्हा महसूल प्रशासनास सहजपणे उपलब्ध होऊ शकते. मात्र त्यांच्याकडून पात्र शेतकऱ्यांची संख्या उपलब्ध नाही. अशी देखील माहिती समोर आलेली आहे.