PM Kisan Yojana | केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवलेल्या असतात. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढावे, तसेच त्यांच्या पिकांना चांगला हमीभाव मिळावा. यासाठी सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. त्यातीलच एक सगळ्यात लोकप्रिय योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. (PM Kisan Yojana) ही योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला 6 हजार रुपये केंद्र सरकारकडून मिळतात. हे पैसे तीन समान हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खातात जमा केले जाते. 2018 साली भारत सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आपला भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारतातील बहुतांश लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
आतापर्यंत केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana_ योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता सगळे शेतकरी 18 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दर चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. मागील जून महिन्यामध्ये 17 वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. आता पुढील हप्ता कधी येणार आहे? याची सगळेजण वाट पाहत आहे. आणि आज या शेतकऱ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पीएम किसन सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता लवकरच म्हणजे ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती आलेली आहे.
ऑक्टोबर महिन्यात जमा होणाऱ्या पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्यातून जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु जर तुम्हाला या योजनेचा हप्ता पाहिजे असेल, तर तुम्ही ई केवासी करणे खूप गरजेचे असते. जर तुमचेही केवायसी केलेली नसेल तर तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही. आता हे ई केवायसी कसे करायचे हे आपण जाणून घेणार आहोत.
इ केवायसी कसे करायचे ? | PM Kisan Yojana
- करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तिथे फार्मर कॉर्नर्सेशनवर क्लिक करा आणि त्यानंतर केवायसी हा पर्याय दिसेल.
- त्यानंतर तुमचा आधार कार्ड टाका आणि मोबाईल नंबर टाका तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट करा.
- त्यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होईल आणि प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्हाला मेसेज देखील येईल.