PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवलेल्या आहेत. ज्या सगळ्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत असतो. परंतु त्यातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक सगळ्यात मोठी आणि लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार हे शेतकऱ्यांना आर्थिक रूपाने मदत करत असते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना शेती करताना होतो. शेतकऱ्यांना दरवर्षी सरकारकडून 6 हजार रुपये दिले जातात. दोन- दोन हजाराच्या 3 हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जातात. आत्तापर्यंत 10 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि त्यांनी या योजनेमध्ये नाव नोंदणी केलेली आहे.
तुम्ही शेतकरी असाल आणि अजूनही पीएम किसान (PM Kisan Yojana) योजनसाठी अर्ज केला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या. आता या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. याची पात्रता काय आहे? त्याचा फायदा तुम्हाला कसा होईल? आणि नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे? याची आपण माहिती जाणून घेऊया.
नोंदणी कशी करायची ?
- सगळ्यात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय येईल तेथे तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक टाकून राज्य निवडा.
- त्यानंतर ओटीपी एंटर करा आणि नोंदणीसाठी पुढे जा हा पर्याय निवडा.
- तसेच विचारलेले सगळे तपशील भरा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी टाका आणि सगळी कागदपत्र अपलोड करा.
पीएम किसान योजनेची पात्रता काय आहे? | PM Kisan Yojana
- ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन आहे तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.भाडेकरू आणि इतरांच्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी पात्र नाहीत.
- 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेले छोटे आणि सीमांत शेतकरी पंतप्रधान किसान योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या योजनेचा फोकस सर्वात गरजू शेतकऱ्यांवर आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
- पीएम किसान योजना सर्वसमावेशक आहे आणि यामध्ये सर्व श्रेणीतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतीच्या कामात गुंतलेल्या कुटुंबांव्यतिरिक्त, वैयक्तिक शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र आहेत.
- इतर अनेक कल्याणकारी योजनांप्रमाणे, पीएम किसान योजनेत वयोमर्यादेचे कोणतेही बंधन नाही. या योजनेअंतर्गत सर्व वयोगटातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते.