Bussiness Idea | घरबसल्या कमी खर्चात करू शकता ‘हे’ व्यवसाय, महिन्याला होईल लाखोंनी कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bussiness Idea | आजकाल अनेक लोक असे आहेत. जे नोकरी करता करता एक्स्ट्रा इन्कम घेण्यासाठी एक स्वतःचा असा घरगुती व्यवसाय चालू करतात. जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होतो. तुम्ही अनेक अशा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करू शकता. ज्यातून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल. परंतु अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की, असे कोणते व्यवसाय सुरू करावे? जे घरच्या घरी करता येईल आणि त्यातून चांगले देखील होईल. आता आम्ही तुम्हाला अशा काही व्यवसाय बद्दल सांगणार आहोत. जे तुम्ही अगदी कमी पैशांमध्ये सुरू करू शकता. आणि त्यातून तुम्हाला खूप चांगला व्यवसाय (Bussiness Idea) करता येईल.

लोणची बनवण्याचा व्यवसाय

तुम्ही अगदी घरबसल्या हा व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला 10 हजार रुपये गुंतवावे लागतील. त्याचप्रमाणे दर महिना तुम्ही कमीत कमी 30 हजार रुपये आणि वार्षिक लाखो रुपये सहज कमवू शकता. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घाऊक पद्धतीने तसेच किरकोळ बाजारात देखील हे लोणचे विकू शकता.

अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय

तुम्ही घरच्या घरी अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी अनेक प्रकारची यंत्र वापरली जातात. यामध्ये मिक्सर मशीन आणि मुख्य उत्पादन मशीन यांचा समावेश असतो. अगरबत्ती बनवण्याच्या मशीनची किंमत हे 35000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. तुम्ही जर हा व्यवसाय सुरू केला, तर सुरुवातीला तुम्हाला जरा खर्च येईल परंतु यातून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कमवू शकता.

टिफिन सेवा व्यवसाय | Bussiness Idea

घरात बसल्या महिला देखील हा व्यवसाय सुरू करू शकतात. तुम्ही अगदी तुमच्या घराच्या आजूबाजूपासून सुरुवात करा. टिफिन सेवेसाठी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सुरुवातीला 8 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत व्यवसाय सुरू करता येईल. तुमचे जेवण आवडत असेल तर तुम्ही दर महिन्याला एक ते दोन लाख रुपये देखील कमवू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही मार्केटिंग देखील करू शकता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सहज ग्राहक मिळून जातील.

सरकार देखील मदत करणार

केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. अगदी व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील व्यवसाय योजना आहेत. याद्वारे तुम्ही घर बसेल व्यवसाय सुरू करू शकता. यातून तुम्हाला सरकार देखील काही योजनांच्या माध्यमातून मदत करत आहेत.