PM kissan Sanman Nidhi Yojana | केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना चांगले आर्थिक पाठबळ मिळावे, त्याचप्रमाणे त्यांच्या शेतातील पीक चांगले यावे. या उद्देशाने सरकारने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्यातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही सरकारची लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा लाभ भारतातील कितीतरी शेतकऱ्यांना होत असतो. या योजनेच्या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 6000 रुपये एवढे आर्थिक पाठबळ दर वर्षाला देत असतात. आतापर्यंत या योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि आता सगळे शेतकरी 17 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता या 17 व्या हप्त्याबाबतच एक मोठी बातमी समोर आलेली आहे.
केंद्र सरकार योजनेचे मूल्यमापन करणार | PM kissan Sanman Nidhi Yojana
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता कधी मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यापूर्वी केंद्र सरकार त्याचे मूल्यमापन देखील करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. यासाठी NITI आयोगाशी संबंधित विकास देखरेखाने मूल्यमापन कार्यालयांनी या योजनेच्या मूल्यमापनासाठी विविध मागवलेले आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार दरवर्षी 60 हजार कोटी रुपयांचा खर्च करत असते.
पीएम किसान योजनेचे मूल्यमापन करण्याचा उद्देश काय?
या योजनेअंतर्गत (PM kissan Sanman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या किती आर्थिक गरजा पूर्ण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर काय परिणाम झाला आहे?या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी सरकार या योजनेचे मूल्यमापन करणार आहे.
सरकारने 2024 -25 या वर्षासाठी या योजनेसाठी 60000 कोटी रुपये राखून ठेवलेले आहे. या योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी 24 राज्यांमधील किमान 5000 शेतकऱ्यांच्या सर्वेक्षणात समाविष्ट केले जाणार आहे. त्यापैकी 17 राज्यांमध्ये सुमारे 95 टक्के पीएम किसान लाभार्थी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल. त्याचप्रमाणे बी- बियाणे वेळेवर खरेदी करता येईल. यासाठी हे मूल्यबाबत केले जाणार आहे.