मोदींनी घोषणा केलेल्या 400 पारचा गेम संघानंच केलाय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ता ही भ्रष्ट असते.. मग जर कधी भविष्यात जनसंघ म्हणजे आत्ताचा भाजप सत्तेत आला तर भाजपलाही हीच गोष्ट लागू होते का? संघाचे प्रचारक आणि भाजपतील बडे नेते दिनदयाळ उपाध्याय यांना विचारण्यात आलेला हा अवघड प्रश्न.. त्यांनी या प्रश्वाचं उत्तर देताना होय, असं घडू शकतं असं स्पष्टपणे बोलून दाखवलं.. पण जेव्हा कधी असं होईल तेव्हा संघ आपली ताकद दाखवून देईल, असा इशाराही दिला होता.. कट टू २०२४. संघाच्या आशिर्वादाने भाजप २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन टर्म सत्तेवर राहीला.. पण २०२४ ला ४०० पारच्या मोठ्या घोषणा करणाऱ्या भाजपची गाडी २४० वरच येऊन थांबली.. यानंतर भाजपच्या अपयशाची जेव्हा कारणं पडताळून पाहिली जाऊ लागली तेव्हा त्यात सर्वात जास्त हायलाईट झालेलं कारण समोर आलं ते म्हणजे याच संघाला हलक्यात घेण्याची केलेली चूक…

आम्ही कमकुवत होतो तेव्हा आम्हाला संघाची गरज होती पण आता भाजप स्वत:च्या जिवावर पक्ष चालवू शकतो.. असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या या स्टेटमेंटनंतर संघ आणि भाजपच्या संबंधामध्ये विस्तव पडलाय त्याची पहिली झलक पहायला मिळाली.. त्यानंतर भाजपला निवडणुकीत अतिआत्मविश्वास नडला… अशा संघाच्या भुमिकेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये फिस्कटलंय हे तर कन्फर्म होतं.. पण मग ज्या संघाच्या जीवावर आज भाजप सत्तेत आहे. त्याच भाजपला संघाचा कंट्रोल का नकोय? संघापेक्षा भाजप स्वत:ला वरचढ समजू लागलाय का? २०२४ मध्ये भाजपचं हवेतील विमान जमिनीवर आणण्यासाठीच संघानं मुद्दामहून भाजपचं काम केलं नाही ना? या आणि अशा अनेक बिहाईंड पॉलिटीक्स घडलेल्या स्टोरीचा हा इंटरेस्टिंग आढावा…

Narendra Modi यांनी घोषणा केलेल्या, ४०० पारचा गेम संघानंच केलाय? | Mohan Bhagwat

संघ आणि भाजप यांच्यातील संबंध बिघडण्यासाठी सर्वात मोठं कारण ठरलं ते म्हणजे अयोध्येतील राम मंदिराचं…

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून भाजप आणि आरएसएस मध्ये बराच वाद पाहायला मिळाला…संघाचं म्हणणं असं होतं की राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला राजकीय रंग न देता याला राष्ट्रीय आंदोलन बनवण्यात यावं… रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा ही राजकीय नेत्याच्या हातून न होता हिंदू साधूंच्या हातून व्हावी…सोहळ्याला कोणत्याही सिनेस्टार अभिनेत्यांना बोलवू नये.. याला कोणताही ग्लॅमर न देता हा सोहळा धार्मिक विधीप्रमाणेच व्हावा… तसंच मंदिराचं उद्घाटन निवडणुकीनंतरच करावं… जर लवकर उद्घाटन झालं तर हा मुद्दा लोकांच्या लक्षातून जाईल, असे अनेक सल्ले संघाने भाजपला दिले होते… पण या संघाच्या मतांना केराची टोपली दावत भाजपने या उद्घाटन सोहळ्याला जितका जास्त राजकीय रंग देता येईल तितका देण्याचा प्रयत्न केला… अर्थात संघाचा हा सल्ला न ऐकल्यामुळे संघ आणि भाजपमध्ये बराच तणाव निर्माण झाला होता…

संघ आणि भाजप संबंधांमध्ये बिघाड होण्याचं दुसरं कारण ठरलं ते म्हणजे स्वायत्त संस्थांच्या राजकारणावरून विरुद्ध मतं

राजकारणावर वचक ठेवण्यासाठी भाजपने इडी, सीबीआय यांसारख्या स्वायत्त संस्थांचा चुकीचा वापर केल्याचा आरोप होऊ लागला…इतकच काय तर विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्याचा कार्यक्रमही एका मागून एक भाजपने चालवला.. विशेष म्हणजे यामध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते अशा नेत्यांचाही समावेश झाला…आरएसएसला मुळात हीच गोष्ट खटकली… स्वायत्त संस्थांचा अतिरेकी वापर होऊ नये त्यासोबतच इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये घेऊन आपली क्रेडिबिलिटी घालवू नये असं संघाचं म्हणणं होतं… पण इथेही भाजपने संघाचं काहीएक न ऐकल्यामुळे संघ आणि भाजपमध्ये फिस्कटायला सुरुवात झाली…

याच यादीतलं तिसरं कारण आहे ते म्हणजे संघाला हलक्यात घेणं…

2019 ला मोदी सरकार बहुमतात सत्तेत आलं…यानंतर आपल्या पक्षाला कुठल्या बाहेरच्या कंट्रोलची गरज नाही असा भाजपचा वावर सुरू झाला… अनेक गोष्टींमध्ये संघाने दिलेला शब्द भाजपा डावलू लागला… यावरून दोघांच्यात खटके उडायला सुरुवात झाली… आपल्याला संघाची गरज नसल्याचं जे. पी. नड्डा यांनी केलेले स्टेटमेंटवरून दोघांच्यातील संबंध किती ताणले होते याचा आपल्याला विचार करता येईल…हे कमी होतं की काय म्हणून लोकसभेच्या प्रचारात संघाला विश्वासात घेतलं नसल्याची संघ कार्यकर्त्यांची तक्रार होती…संघ स्वयंसेवकांपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांवर भाजपने जास्त विश्वास ठेवला… हे सगळं घडत असताना आता पाणी नाकापर्यंत आलय हे लक्षात आल्यानंच भाजपाला अद्दल घडवायची म्हणून संघाने प्रचारातून अंग काढून घेतलं असावं.. याचाच परिणाम म्हणून 400 पारच्या हवेत गिरक्या मारणार भाजपचं विमान 240 वर येऊन बंद पडलं…थोडक्यात भाजपाला धडा शिकवण्यासाठीच आरएसएसची ही खेळी असल्याचं काही राजकीय विश्लेषक सांगतायेत…

जाताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑब्झर्वर या मासिकात भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत अति आत्मविश्वास नडला… संघाला हलक्यात घेतल्याचे हे परिणाम आहेत… अशा बेधडक कानपिचक्या मासिकातून दिल्यात… त्यामुळे संघ आणि भाजपचं फिस्कटलंय…हे तर कन्फर्म आहे… पण आता लोकसभेला बसलेला फटका पाहता संघाला हलक्यात घेऊन चालणार नाही हे भाजपच्या पक्क ध्यानात आलं असावं…येत्या काळात दोघांच्यातील संबंध पुन्हा सुरळीत होतील का? की असेच ताणले जातील? तुम्हाला काय वाटतं? जर तुमचं काही वेगळं मतं असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.