हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सभांचा धडाका लावला आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोदी नवनवीन आश्वासने आणि ग्वाही देत आहेत. आज पश्चिम बंगाल येथील एका जाहीर प्रचारसभेत मोदींनी जनतेला ५ मोठी आश्वासने दिली आहेत. तसेच यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांचे टीएमसी सरकार आणि इंडिया आघाडीवर निशाणा साधला.
मोदी आपल्या भाषणात म्हणाले, मी भ्रष्टाचाराच्या पीडितांना आणि बंगालच्या जनतेला सांगेन, एकही भ्रष्ट माणूस वाचणार नाही, मी भ्रष्टाचाराने त्रस्त असलेल्या प्रत्येक बंगालीला सांगेन, एकही भ्रष्ट माणूस वाचणार नाही. त्यांच्याकडून वसूल केलेले हे कोट्यवधी रुपये पीडितांना मिळवून देण्याचा मार्ग मी शोधतोय. विकसित भारतासाठी विकसित बंगाल आवश्यक आहे. तुम्हाला टीएमसीच्या गुंडांना घाबरण्याची गरज नाही, मोठ्या संख्येने मतदान करा. जास्तीत जास्त कुटुंबात जा आणि लोकांना भेटा आणि म्हणा की मोदीजी आले होते आणि त्यांनी तुम्हाला जय श्री राम सांगितले आहे.
पीएम मोदींच्या 5 गॅरंटी
जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही.”
जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत कोणीही CAA रद्द करू शकणार नाही.”
जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत तुम्हाला रामनवमी साजरी करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.”
जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कोणीही रद्द करू शकत नाही.”
जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि OBC यांचे आरक्षण संपणार नाही.”