#YesBank crisis: बडोद्याप्रमाणेच पिंप्री-चिंचवड महापालिकेचे सुद्धा ९३५ कोटी वाचवता आले असते..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘येस’ बँकेतील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करताना मोदी-शहांवर निशाणा साधला आहे. ‘येस बँकेवर निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच बडोदा महानगरपालिकेच्या बडोदा स्मार्ट डेव्हलमेंट कंपनीचे २६५ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेलाही याची कल्पना दिली गेली असती तर त्यांचेही ९०५ कोटी रुपये वाचले असते. पण गुजरातप्रेमापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना इतर कोणी दिसत नाही,’ असा सणसणीत टोला सावंत सचिन सावंत यांनी भाजपाला हाणला आहे.

मोदींच्या सत्तेत खऱ्या अर्थाने हिंदूच संकटात आहेत. कारण ‘येस’ बँकेत ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यात बहुसंख्य हिंदूच आहेत असं म्हणत सावंत यांनी भाजपावर सरसंधान साधले. येस बँकेवर निर्बंध घातल्यानं महाराष्ट्रातील १०९ बँका अडचणीत आल्या असून यात विदर्भातील मध्यवर्ती बँकांसह काही सहकारी बँकाही आहेत. तसंच, अनेक पतसंस्थांच्या ठेवीही याच बँकेत आहेत. त्यामुळं या पतसंस्थाही अडचणीत सापडल्या आहेत, अशीही माहिती सावंत यांनी दिली आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment