परीक्षेची भीती मनातून काढून टाका; मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परीक्षेची भीती मनातून काढून टाका, एखाद्या सण- उत्सवा प्रमाणे परीक्षेला सामोरे जावा असा कानमंत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमात मोदींनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी छोटी छोटी उदाहरणं देऊन त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मनात तयार करा की, परीक्षा जीवनाची साधी गोष्ट आहे. आपल्या विकास यात्रेचे हे लहान टप्पे आहेत. या टप्प्यातून आम्हीही गेलो आहोत. यापूर्वीही आम्ही अनेकदा परीक्षा दिली आहे. जेव्हा हा विश्वास निर्माण होतो. पुढच्या काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी हा अनुभव ताकद म्हणून कामी येतो.

जेव्हा तुम्ही ऑनलाइन अभ्यास करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात अभ्यास करता की रील्स पाहता ? दोष ऑनलाइन किंवा ऑफलाइनचा नाही. वर्गातही कितीतरी वेळा तुमचं शरीर वर्गात असतं, तुमची नजर देखील शिक्षकाकडे असते, परंतु एकही शब्द कानावर जाणार नाही, कारण तुमचं मन दुसरीकडे कुठेतरी असतं.

मोदी म्हणाले, युग बदलते, तशी माध्यमंही बदलत आहेत. पूर्वी सर्व शिक्षण कंठस्थ असे. श्रवणशक्तीद्वारेच अनेक पिढ्यांनी शिक्षण आत्मसात केले. नंतर छपाईचं युग आलं तेव्हा लोकांनी त्यात स्वतःला बदलून घेतलं. ही क्रांती सातत्याने सुरुच असते. आज आपण डिजिटल माध्यमातून, नव्या तंत्रज्ञानाच्या टूल्सद्वारे शिकत आहोत. हे एक व्यापक युग आहे. ही आपण संधी म्हणून स्वीकारले पाहिजे.

Leave a Comment