नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्चुअल मीटिंगमध्ये ‘RBI Retail Direct Scheme’ लाँच केली. ही योजना किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी बॉण्ड्सची ऑनलाइन खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी देते. याशिवाय एकात्मिक लोकपाल योजनेद्वारे तक्रारींचे निवारण करण्यासाठी RBI नियम बनवू शकेल. हे एक पोर्टल, एक ई-मेल आणि एक ऍड्रेस आहे जिथे तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात.
RBI चे गव्हर्नर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आजच्या लॉन्चच्या वेळी उपस्थित होत्या. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने फेब्रुवारी 2021 च्या आर्थिक धोरणात ही योजना जाहीर केली होती.
Retail Direct Scheme काय आहे हे जाणून घ्या?
RBI च्या Retail Direct Scheme चा मुख्य उद्देश किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सरकारी बॉण्ड्समध्ये एक्सेस वाढवणे आहे. या योजनेअंतर्गत, किरकोळ गुंतवणूकदार केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेल्या कोणत्याही सिक्युरिटीजमध्ये थेट गुंतवणूक करू शकतात. इतकेच नाही तर ते सरकारी बॉण्ड्ससाठी RBI मध्ये सहज खाते उघडू शकतील. यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.